Health Care News: फिट राहण्यासाठी दोरी उड्या मारताय? मग या चुका टाळा

Weight Loss करण्यासाठी दोरी उड्या मारताय? तर ही घ्या काळजी
Health Care News: फिट राहण्यासाठी दोरी उड्या मारताय? मग या चुका टाळा
Updated on

तंदुरुस्त राहण्यासाठी आपण सर्वजण विविध प्रकारचे व्यायाम करतो. साधारणपणे, तुम्हालाही आवडेल असा फिटनेस रूटीन पाळण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार फिटनेस रूटीन फॉलो करतो. काहींना योगा करायला आवडते तर काहींना कार्डिओ. पण स्किपिंग रोप हे प्रत्येकाला आवडणारे व्यायाम आहे.

दोरीवरच्या उड्यांमुळे पाय, पोट, खांद्यांचा व्यायाम होतो. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसचं दोरी उडयांमध्ये लक्ष केंद्रीत करावं लागत असल्याने यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यासही मदत होते.

असे बरेच लोक आहेत जे लहानपणी दोरी उड्या मारायचे. त्यांना आता बालपणीचा खेळ स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा उत्तम मार्ग वाटतो. दोरी उड्या मारणे हा एक उत्तम व्यायाम आहे. परंतु ते योग्यरित्या करणे फार महत्वाचे आहे. दोरी उड्या मारताना अनेकदा लोक काही छोट्या चुका करतात, ज्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

Health Care News: फिट राहण्यासाठी दोरी उड्या मारताय? मग या चुका टाळा
Health Care News: जास्त गोड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते का? जाणून घ्या

दोरी उड्या मारण्याचे अनेक फायदे असले तरी काही आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी चुकुनही दोरीवरच्या उड्या मारू नये. यामुळे फायदा होण्याएवजी आरोग्याच्या समस्या अधिक वाढू शकतात तसंच काही गंभीर समस्या निर्माण होवू शकतात.

कोणी दोरी उड्या मारणं टाळावं...

गुडघ्यांच्या समस्या असल्यास- दोरी उड्या मारल्याने पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होत असली तरी जर तुम्हाला गुडघ्याच्या समस्या असतील तर दोरी उड्यांचा व्यायाम करणं टाळावं.

ज्या व्यक्तीच्या गुडघ्यांमध्ये वेदना होत असतील तसंच गुडघेदुखीचा त्रास असेल तर दोरी उड्या मारणं टाळावं.

त्याचप्रमाणे पाय किंवा गुडघ्यांना मोठी दुखापत झाली असल्यास एखादी शस्त्रक्रिया झाली असल्यास दोरी उड्या मारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

संविधाताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी चुकूनही दोरी उड्या मारू नयेत. यामुळे त्रास किंवा वेदना अधिक वाढू शकतात. एवढंच नव्हे तर संधिवाताचा त्रास असूनही दोरी उड्या मारल्यास हाडं तुटण्याची मोठी शक्यता असते.

तसंच सांधेदुखीमध्ये दोरी उड्या मारल्यास पायाच्या किंवा गुडघ्याच्या सांध्यांमध्ये गंभीर इजा होण्याची शक्यता असते.

दम्याचा त्रास असल्यास- दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी एखादं अवजड काम केल्यास लगेचच थकवा येतो. तसचं त्यांना दम लागलो. दोरी उड्या ही एका प्रकारे हाय इंटेंन्सिटीं कार्डियो एक्सरसाइज आहे. यासाठीच दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दोरी उड्या मारणं टाळावं.

हृदय शस्त्रक्रिया झाली असल्यास- दोरी उड्या मारणं हे हृदय निरोगी राहण्यासाठी गरजेचं असलं तरी ज्या व्यक्तींचं हार्टचं ऑपरेशन किंवा सर्जरी झाली असेल त्यांनी दोरी उड्या मारू नये. अन्यथा हृदयाचं प्रेशर वाढू शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.