Health Care: साष्टांग नमस्कार करण्याचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या

आजही काही ठिकाणी लोक एकमेकांना हात जोडून नमस्कार करतात.
Health
Health sakal
Updated on

अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास साष्टांग नमस्कार खूपच लाभदायक मानला जातो. सोबतच ही मुद्रा आपल्याला याची जाणीव करुन देते की सर्व काही त्या इश्वराचं आहे आणि ते त्यालाच समर्पित आहे.

ऋषीमुनींच्या मते शिक्षक आणि वडीलधाऱ्यांच्या पायांना स्पर्श केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच व्यक्तीला शक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, सुख-समृद्धी प्राप्त होते.सनातन धर्मात आपल्या वयाच्या व्यक्तीला हात जोडून नमस्कार करण्याची परंपरा आहे. ही परंपरा दैवी काळापासून चालत आलेली आहे.

आपल्यालाही लहानपणी आईवडिलांनी शिकवले आहेच, घरात पाहुणे आले की त्यांना वाकून नमस्कार करायचा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा.

Health
Best Investment Plans : महिलांनो, गुंतवणूक कुठे करावी कळत नाही? हे घ्या 5 वर्षांसाठी 5 बेस्ट पर्याय

आजही काही ठिकाणी लोक एकमेकांना हात जोडून नमस्कार करतात. तज्ज्ञांच्या मते, मोठ्यांच्या पायांना स्पर्श केल्याने त्यांच्या पायावर डोकं ठेवल्याने त्यांचा आशीर्वाद तर मिळतोच, पण पाठदुखीपासून देखील आराम मिळतो. व्यक्तीला शक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, सुख-समृद्धी प्राप्त होते.सध्याच्या काळात असे म्हटले जाते की पायाला स्पर्श केल्याने व्यक्तीचे आयुष्य वाढते आणि भाग्य लाभते.

पायावर डोकं ठेवून नमस्कार केल्याचे फायदे:-

1. जर तुम्ही खूप दिवसांपासून कंबर आणि पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर रोज सकाळी आई-वडिलांच्या पायांना स्पर्श करून पूजा करा. असे म्हणतात की साष्टांग नमस्कार केल्याने कंबर आणि पाठदुखीमध्ये खूप लवकर आराम मिळतो.

या दरम्यान, शरीरात एक झुकाव असतो. तसेच शरीरातील रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. शास्त्रानुसार दररोज आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.

Health
Makeup Mistakes Solution: मेकअप करताना झालेल्या चुका अशा सावरा;चेहरा अधिक विद्रुप दिसण्यापासून वाचवा!

2.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वृद्धांच्या पायाला स्पर्श केल्याने कमरेच्या वरच्या भागात रक्ताभिसरण व्यवस्थित होते. त्यामुळे त्वचा आणि केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी रोज सकाळी आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा.

हा एक व्यायाम आहे जो सूर्यनमस्कार दरम्यान केला जातो. याशिवाय, व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप करतानाही लोक दोन्ही हातांनी पायरीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पाठदुखीमध्ये लवकर आराम मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()