Health Care News : 'ही' योगासनं तुम्हाला देतील अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम, जाणून घ्या

'ही' योगासनं तुम्हाला देतील अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम..
Health Care News : 'ही' योगासनं तुम्हाला देतील अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम, जाणून घ्या
Updated on

आजकाल अॅसिडीटी आणि गॅसच्या समस्येने प्रत्येकजण हैराण झाला आहे. अनेकदा चुकीचे अन्न खाल्ल्याने ही समस्या उद्भवते. मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकदा आपल्या पोटात गडबड होते. याने आपल्या आरोग्यावर परिणाम तर होतोच, यासह अल्सर, बद्धकोष्ठता, पोटात संसर्ग यांसारख्या इतर समस्याही शरीरात वाढतात. या समस्येपासून सुटका हवी असल्यास काही योगासनांना फॉलो करा. जेणेकरून तुमची पचनसंस्था सुधारेल.

गॅसपासून आराम मिळवण्यासाठी हे आसन करून पहा

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन हे पवन आणि मुक्त या दोन संस्कृत शब्दांपासून बनलेले आहे. यामध्ये पवन म्हणजे 'हवा' आणि मुक्ता म्हणजे 'रिलीज'. पवनमुक्तासन ही एक आरामदायी मुद्रा आहे जी प्रत्येकासाठी योग्य आहे. या आसनाच्या सरावाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता किंवा अपचन होत नाही. म्हणूनच या आसनाचा नियमित सराव करावा.

अर्धमत्स्येंद्रासन

अर्धमत्स्येंद्रासन हा एक योगासनाचा प्रकार आहे. मधुमेहासोबतच, गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळण्यासाठी फायदेशीर आहे. हे आसन केल्याने पोटावर दाब पडतो ज्यामुळे गॅस सहज बाहेर पडते. यासोबतच शरीर डिटॉक्सिफाईड होते. त्यामुळे पोटाच्या अंतर्गत अवयवांमध्ये रक्ताभिसरणही वाढते.

Health Care News : 'ही' योगासनं तुम्हाला देतील अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम, जाणून घ्या
Tulsi Benefits : केसांची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करतील तुळशीची पानं, असा करा वापर

बालासन

गॅस आणि अॅसिडिटी दूर करण्यासाठी बालासन हे अत्यंत प्रभावी आसन मानले जाते. यामुळे पचन सुधारते आणि अंतर्गत अवयव मजबूत होतात. बालासनाच्या सरावापासून तणावही दूर होतो.

वज्रासन

वज्रासन केल्याने पोटाची समस्या दूर होते. वज्रासनात ३ ते ४ मिनिटांनंतर लगेचच पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. आसनामुळे अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()