Jaundice : शरीरात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होते कावीळ, अशी ओळखा लक्षणं...

शरीरात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होते कावीळ, जाणून घ्या
Jaundice : शरीरात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होते कावीळ, अशी ओळखा लक्षणं...
Updated on

जाँडिस ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्याला आपण कावीळ म्हणून ओळखतो. यामध्ये व्यक्तीच्या डोळ्यांचा आणि त्वचेचा रंग पिवळा होऊ लागतो. ही एक गंभीर समस्या आहे जी नवजात बालकांपासून ते कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. काविळीमुळे तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग, पडदा, चेहरा आणि शरीराची त्वचा हळूहळू पिवळी पडू लागते.

कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कावीळ होते?

तज्ज्ञांच्या मते, शरीरात बिलीरुबिन नावाचे पदार्थ जास्त प्रमाणात असल्यास कावीळ होते, ज्यामुळे यकृतावर परिणाम होतो, त्यामुळे यकृताची कार्य करण्याची क्षमता कमकुवत होते. बिलीरुबिन शरीरात पसरते ज्यामुळे व्यक्ती कावीळची शिकार होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते बिलीरुबिन वाढणे आणि कावीळ होण्याच्या समस्येला काही जीवनसत्त्वे कारणीभूत आहेत. तज्ज्ञांच्या मते, शरीरात व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवू शकते.

Jaundice : शरीरात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होते कावीळ, अशी ओळखा लक्षणं...
Cervical cancer : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी अशी घ्यावी काळजी, जाणून घ्या

व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे बाइल डक्ट ब्लॉक होते, त्यामुळे यकृतातून बिलीरुबिन बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. त्याच वेळी, व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव वाढतो ज्यामुळे अशक्तपणा होतो.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळेही कावीळ होऊ शकते. खरं तर, जेव्हा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते तेव्हा लाल रक्त पेशींची कमतरता देखील असते. आणि जेव्हा लाल रक्तपेशी नष्ट होऊ लागतात तेव्हा बिलीरुबिन तयार होते.

कावीळची लक्षणे

त्वचा, नखे आणि डोळे पिवळे होणे

अपचन

पोटदुखी आणि मळमळ

वजन कमी होणे

पिवळी लघवी होणे

थकवा जाणवणे

भूक न लागणे

ताप येणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.