आधुनिक जगातील सर्वाधिक भयावह आजारांपैकी एक म्हणजे कर्करोग. महिलांना होणाऱ्या कर्करोगांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक कर्करोगाच्या लक्षणांविषयी माहिती घेऊन त्यानुसार जागरूक राहून आणि नियमितपणे आरोग्य तपासणी करवून घेत असल्यास शरीरात कर्करोग उत्पन्न होत असल्याचे लवकर लक्षात येते आणि त्यावर यशस्वीपणे उपचार केले जाऊ शकतात.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांना होणारा, स्तनाच्या कर्करोगानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे.कर्करोगाचा हा प्रकार केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर महिलांसाठी गंभीर आरोग्य समस्या आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की जीवनशैलीत काही बदल करून हा कॅन्सर स्वतःपासून दूर ठेवला जाऊ शकतो.
नियमित तपासणी आवश्यक आहे
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी, 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व मुली आणि महिलांनी नियमित तपासणी आणि लसीकरण केले पाहिजे. एचपीव्ही लसीकरण गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करते. नियमित पॅप स्मीअरमुळे गर्भाशय ग्रीवामधील कोणतेही असामान्य बदल लवकर ओळखता येतात, ज्यामुळे उपचार लवकरात लवकर सुरू होऊ शकतात.
निरोगी आहार
फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य आवश्यक जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात. हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात, जे HPV सारख्या संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यक आहे.
धूम्रपान करू नका
तुम्हाला माहिती आहे का की, धूम्रपान सोडल्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा विकास रोखता येतो. यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहते आणि इतर कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.
अल्कोहोलचे सेवन कमी करा
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे अल्कोहोलचे सेवन टाळा. या बदलांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
वजन नियंत्रणात ठेवा
लठ्ठपणा इतर आरोग्य समस्यांसह गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायामाच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवा.
तणाव कमी करा
योग आणि ध्यान करून तणाव कमी करा. दीर्घकाळापर्यंत तणावामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. पण योग आणि ध्यान यांसारख्या क्रियाकलापांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.