लव्हेंडर ऑइलमुळे होईल मानसिक थकवा दूर; जाणून घ्या ७ गुणकारी फायदे

 health news benefits of lavender essential oil
 health news benefits of lavender essential oil
Updated on

प्रत्येक फुलामध्ये एक खास वैशिष्ट्य असतं. काही फुलं त्याच्या सुवासासाठी ओळखली जातात.तर, काही फुलं त्याच्यातील औषधी गुणधर्मांमुळे. या सगळ्यात लव्हेंडर हे फूल सुवास आणि औषधी गुणधर्म या दोन्हीसाठी खासकरुन ओळखलं जातं. स्पा करणं असो किंवा एखाद्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं असो अनेकदा लव्हेंडर फूलाचीच निवड केली जाते. लव्हेंडरची फूलं खासकरुन त्याच्या सुवासासाठी लोकप्रिय आहेत. मात्र, सुवासासोबतच या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे फार कमी जणांना माहित आहेत. अगदी शारीरिक थकवा दूर करण्यापासून ते मानसिक शांतता मिळण्यापर्यंत या फुलाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे या फुलाचे गुणधर्म आणि त्याचे फायदे कोणते ते पाहुयात. त्याचसोबत या फुलांचा किंवा त्याच्या तेलाचा वापर कसा करावा हेदेखील जाणून घेऊयात. 

१. लव्हेंडरच्या तेलाचा जास्त वापर अरोमाथेरपीसाठी केला जातो  साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, या तेलामुळे शरीरावर असलेले व्रण किंवा डागदेखील दूर होऊ शकतात. अनेकदा महिलांची प्रसूती होत असताना त्यांना एपीसीओटीमी (सर्जिकल कट) होतो. अशा जागेवर लव्हेंडर ऑइल लावलं तर हे व्रण लवकर भरुन निघतात.

२. लव्हेंडर तेलामध्ये काही औषधी वनस्पती एकत्र करुन या तेलाने दररोज डोक्याची मालिश केली. तर, केसगळती दूर होते.

३. लव्हेंडरमध्ये किटक, जंतू नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे घरातील फरशी पुसताना पाण्यात बेकिंग सोडा आणि लव्हेंडर ऑइलचे  काही थेंब टाकावेत.

४. अनेक जणांना प्रवास करताना मळमळ होणे किंवा उलटी होणे अशा समस्या असतात. अशा वेळी प्रवासादरम्यान ठराविक काळाने लव्हेंडर तेलाचा वास घेत रहावा. त्यामुळे मन प्रसन्न होते व प्रवासादरम्यानचा त्रास कमी होतो.

५. कपडे धुतांनादेखील लव्हेंडर ऑइलचा वापर करता येऊ शकतो.

६. लव्हेंडर तेलाने डोक्याची किंवा हातापायांची मालिश केल्यास मानसिक थकवा दूर होतो. तसंच एकाग्रता वाढते.

७. केसांमध्ये उवा झाल्या असतील तर लव्हेंडर ऑइलमध्ये टी ट्री ऑइल मिक्स करुन हे तेल केसांना लावावं.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
india 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.