Liver Health : फॅटी लिव्हरचा धोका टाळण्यासाठी तुमच्या आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

जर योग्य आहार, आहाराची योग्य वेळ नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवु लागता. विशेष करुन पचनसंस्था.
health news Include these foods in your diet to prevent fatty liver
health news Include these foods in your diet to prevent fatty liver
Updated on

बदलत्या जीवनशैलीमुळं आरोग्याकडे अधिक लक्ष देणं गरजेंच झालं आहे. यकृत हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे जो तुमच्या पचनसंस्थेचा एक भाग आहे. त्यामुळं धकाधकीच्या जीवनात प्रत्येकान आपल्या आहारात अनेक बदलं करणं गरजेंच आहे. आपण नेमका कोणता आहारा घेतो, आहार घेण्याची योग्य वेळ कोणती या सर्वांकडे आपण सर्वांनी काळजीपुर्वक पाहणे गरजेचं आहे.

जर योग्य आहार, आहाराची योग्य वेळ नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवु लागता. विशेष करुन पचनसंस्था. यकृत हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे जो तुमच्या पचनसंस्थेचा एक भाग आहे आणि रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात, पोषक घटकांचे चयापचय आणि योग्य प्रतिकारशक्ती राखण्यात भूमिका बजावते. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीची गाडी यकृताकडे येऊन थांबते.

health news Include these foods in your diet to prevent fatty liver
Health Care News : जाडजूड मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी 'हे' व्यायाम नक्की करा, पाय दिसतील सुंदर...

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या यकृतासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यकृत शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या सतत वाढत आहे.

health news Include these foods in your diet to prevent fatty liver
Monsoon Health Care : पावसाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी! जीवनशैलीत करा हे बदल...

फॅटी लिव्हर रोग म्हणजे यकृतातील चरबीचे प्रमाण वाढणे, त्यानंतर यकृत सामान्यपणे कार्य करू शकत नाही. भविष्यात हा आजार तुम्हाला अनेक धोकादायक आजारांना बळी पडू शकतो.

हिरव्या भाज्या

पालक, मेथी, तांदळी, पोकळा यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे यकृत निरोगी ठेवतात. मेथी, हिरव्या भाज्या, धणे, पुदिना, बथुआ, ब्रोकोली, गाजर, बीटरूट, काकडी, कोबी इत्यादी फळ भाज्या यकृतातील चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

मासे

माशांमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांमधील चांगले जीवाणू वाढवतात, ज्यामुळे पचनसंस्था सुधारते. माशांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन डी असते जे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

health news Include these foods in your diet to prevent fatty liver
Health Care Tips : पावसाळ्यात आळस दूर करण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो; दिवसभर रहाल फ्रेश...

सुका मेवा

काजू, बदाम, अक्रोड, मनुका आणि अंजीर यांसारखा सुका मेवा रीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात जे यकृतासाठी फायदेशीर ठरू शकतात. फॅटी लिव्हर रोग कमी करण्यासाठी अक्रोड सर्वात फायदेशीर आहे.

एवोकॅडो

निरोगी चरबी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, एवोकॅडो यकृतातील चरबी कमी करण्यास मदत करते आणि यकृताचे कार्य सुधारते.

health news Include these foods in your diet to prevent fatty liver
Oral Health : पावसाळ्यात तोंडाची स्वच्छता का महत्त्वाची आहे? 'या' खास पद्धतींचा आजच करा वापर

लसूण

लसणात असे घटक आढळतात जे शरीरातील चरबी कमी करतात आणि पचनसंस्था सुधारते. याशिवाय, यकृतातील चरबी कमी करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे फॅटी लिव्हर रोग नियंत्रित करण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com