लहान मुलांसाठी दूध म्हणजे अमृत आहे. मुलं एक वेळ जेवली नाही तरी चालतील पण त्याने दूध पिलं पाहिजे हा आजकालच्या आयांचा हट्ट असतो. कारण दुधामधून भरपूर व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स बी, मॅग्नेशियम असे पदार्थ त्यांना मिळतात. अशी समजूत यांचे आहे.
दूधाने मुलांची भूक भागते. त्यांना पुरेसे पोषण तत्व मिळतात. दुधामुळे मुलांची वाढ योग्य होते. अशा अनेक समजूती आहेत. पण आजकालची मुलं फक्त दूध पितो असं नाही,तर त्यामध्ये चॉकलेट पावडर आणि साखर घालून पितात. (Child health)
साखर हा पदार्थ आपल्या शरीरासाठी पोषक नाही. चव म्हणून ठीक आहे पण साखरेचा अतिरेक झाला तर मधुमेहासारखा गंभीर आजार होतो. मधुमेह हा चाळीशी ओलांडलेल्या लोकांनाच नाही तर लहान मुलांमध्ये सुद्धा उद्भवत आहे. त्यामुळेच दुधात साखर टाकून पिण्याचे दुष्परिणाम काय आहेत हे आपणास जाणून घेणार आहोत.
साखरेचे प्रमाण आपल्या आहारात कमी असावे असे तज्ञ सांगतात. पण पालक याकडे दुर्लक्ष करतात आणि मुलांना साखर घालून दूध देतात. साखर आणि दुधाचे कॉम्बिनेशन मुलांच्या आरोग्यासाठी घातकच आहे. आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी विशेषतज्ञ डॉक्टर किरण गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
अनेक पालक प्रश्न करतील की, मुलं दूध पीत नाहीत मग त्यात साखर टाकली तर काय होतं. एवढं काय बिघडणार आहे. मुळात पालक इथे चुकतात. मूलं दूध पीत नाहीत म्हणून त्यांच्यामध्ये साखर टाकून देत असाल तर ते दूध पोषण विरहित असणार आहे.
कारण दुधात साखर टाकल्याने दुधामधील सगळे पोषक घटक निघून जातात. त्यामुळे दुधामध्ये असलेले पूर्ण प्रोटीन मुलांना मिळू शकत नाही. दुधाने आपल्या शरीराचे कॅल्शियमची कमी भरून निघते असे म्हणतात. पण दुधात साखर टाकल्याने आपल्याला कॅल्शियम सुद्धा मिळत नाही.
फायदे तर मिळतच नाही पण उलट आपल्याला नुकसानच होते. दुधात साखर टाकून पिल्याने मुलांच्या पोटात जंत वाढू शकतात. मुलांचे पचन संस्था बिघडू शकते, त्यांना सतत पोट बिघडणे पोट फुगणे अशा समस्या उद्भवू शकतात.
मुलांच्या पोटात जंत वाढल्याच्या तक्रारी अनेकदा पाहायला मिळतात. वास्तविक, यामागील कारण गलिच्छ हात, प्रदूषित पाणी इत्यादींशिवाय साखर देखील असू शकते. बाळाला रोज साखर दिल्याने कृमी वाढतात आणि त्यामुळे गुदद्वारात पुरळ उठते आणि मूल खूप अस्वस्थ होते.
डॉ. किरण गुप्ता यांचे म्हणणे आहे की, कॅनमध्ये असलेले दूध, बाळाची काळजी घेणारी इतर उत्पादने आणि साखर इत्यादी कृत्रिम गोष्टी मुलाला देऊ नयेत आणि किमान दोन वर्षांपर्यंत मुलाला साखर देऊ नये आणि त्याला केकसारख्या गोष्टींपासून दूर ठेवावे. पेस्ट्री इ. बालकाला सकस पोषण मिळावे यासाठी फळे, भाजीपाला, धान्ये इत्यादी नैसर्गिकरित्या शिजवलेल्या गोष्टी बालकांना दिल्यास फायदा होतो.
गहू भिजवून त्याचे अंकुर बनवा, ते कोरडे करा, हलके भाजून घ्या आणि बारीक करा. जेव्हा तुम्ही मुलासाठी डाळी, रवा इत्यादी बनवलेली एखादी वस्तू तयार करत असाल तेव्हा त्यात ही पावडर मिसळा आणि मुलाला द्या, यामुळे बाळाला अधिक पोषण मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.