Banana Combinations: केळ्यासोबत या गोष्टी अजिबात खाऊ नका, अन्यथा तुमच्या आरोग्यावर होतील वाईट परिणाम!

केळी खाल्ल्यानंतर लगेच कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.
Banana
Banana sakal
Updated on

केळी हे सदाहरित फळ असून लोक ते आवडीने खातात. पण ज्याप्रमाणे अनेक खाद्यपदार्थ शरीरासाठी हानिकारक असतात, त्याचप्रमाणे आयुर्वेदात केळीसह काही पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. आयुर्वेदात, केळी खाल्ल्यानंतर लगेच कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.

केळी खाल्ल्यानंतर पाणी पिण्याचे धोके

आयुर्वेदात कोणतेही फळ खाल्ल्यानंतर पाणी पिण्यास मनाई आहे आणि केळीलाही तेच लागू होते. केळ हे जड असते आणि ते खाल्ल्यानंतर पचायला खूप वेळ लागतो. ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास अपचन, गॅस, पोट फुगणे, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता अशा समस्या होऊ शकतात. केळी खाल्ल्यानंतर एक तासानंतर फक्त पाणीच नाही तर कोणतेही द्रव पिऊ नये.

Banana
Skin Care: चिमूटभर हळदीमुळे दूर होतील चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग

कफ असेल तर केळीचा शेक नुकसान करेल

आयुर्वेद सांगतो की ज्यांना कफ आहे त्यांनी दुधासोबत केळीचे सेवन करू नये. यात केळीचा शेकही येतो कारण त्यात दूध आणि केळी मिसळतात. जर तुम्हाला खोकला असेल तर तुम्ही केळीसोबत कोणत्याही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ घेऊ नये. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते. आयुर्वेदात केळी आणि दुधाच्या सेवनाने त्वचेच्या ऍलर्जीबद्दल देखील सांगितले गेले आहे.

Banana
Health Tips: महिलांनो मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जरुर वाचा...

रात्री केळी खाणे टाळा

केळी हे एक आरोग्यदायी फळ आहे पण त्याच्या जडपणामुळे ते रात्री न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याच्या थंड प्रभावामुळे तुम्हाला खोकला आणि छातीत त्रास होऊ शकतो. रात्री केळी खाल्ल्यास त्याच्या पचनामध्ये समस्या निर्माण होते, त्यामुळे झोपेवरही परिणाम होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.