Health Tips For Men:
महिला आणि पुरूषांची तुलना केली तर सर्वाधिक तणावाचा सामना पुरूष करत आहेत हे दिसून येते. कारण, पुरूषांना नोकरी आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:कडे लक्ष देणे जमत नाही.
भारतीय समाजातील पुरुषांची जीवनशैली महिलांपेक्षा अधिक व्यस्त आणि जबाबदार आहे. त्यामुळे घरातील आणि बाहेरील गोष्टींमध्ये संतुलन राखणे त्यांना खूप कठीण जाते. विशेषत: अविवाहित आणि घरापासून दूर असलेल्या पुरुषांना अधिक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पुरुष त्यांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देऊ शकत नाहीत.
कधीकधी पुरुषांच्या वाईट सवयी देखील त्यांचे निरोगी आयुष्य खराब करण्याचे कारण बनतात. त्यामुळे पुरुषांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हालाही निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आम्ही सांगितलेल्या या 10 आरोग्यदायी गोष्टी नक्की फॉलो करा.
- तज्ज्ञांच्या मते, फक्त तीच व्यक्ती निरोगी राहू शकते जी सकाळी लवकर उठते. तुम्हालाही उशिरा उठण्याची सवय असेल तर ही सवय लवकरात लवकर बदला.
- जेवणात चांगल्या दर्जाचे तेल वापरा, कारण निकृष्ट दर्जाचे तेल खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
- सकाळी नाश्ता, दुपारी वेळेवर जेवण आणि रात्री 8 वाजेपर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न करा. रात्रीचे जेवण हलके असावे. झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्या.