कडक उन्हात थांबल्यावर घाम येणं, किंवा गॅसजवळ असताना घाम येतो ही सामान्य गोष्ट आहे. आपल्या शरीरातील कॅलरी बर्न होण्यासाठी घाम महत्त्वाची भुमिका पार पाडतो. घाम येणं हे सामान्य आहे.
घाम येण्यात एवढी मोठी गोष्ट काय आहे असे तुम्हाला वाटत असेल. कारण, आपल्या शारीराची रचना अशी आहे की आपण काम केल्याने आपल्या शरीराचा घाम जातो. पण, तुम्हाला माहितीये का? तुम्ही एक काम करत असताना घाम येणं ही सामान्य बाब नाही.
तुमच्या मनात काही वेगळं येण्याआधीच आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही जेवत असताना तुम्हाला घाम येतो का? अशी अनेक माणसे तुम्ही पाहिली असतील, पण जर एखाद्याच्या बाबतीत असे घडले तर त्यामागे काय कारण असू शकते याचा कधी विचार केला आहे का?