Digestion Problem: खाल्लेली कोणतीही गोष्ट पचत नाहीय? मग लाइफस्टाइलमध्ये हा बदल करणे गरजेचे!

digestion problem solution: निरोगी राहण्यासाठी आहार कसा असावा?
digestion problem solution
digestion problem solutionesakal
Updated on

Lifestyle Tips : तुम्हाला सुखी आरोग्याचा मुलमंत्र माहितीय का. तर तो असा आहे की, तुम्ही जे काही खाता ते जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पचत असेल. त्याची उगीचच चरबी जमा होत नसेल तर तुम्ही फिट आहात.

एखादा पदार्थ तुम्ही खाल्लात तो तुम्हाला पचला नाही. तर तुम्ही आजारी आहात असे समजावे. एखाद्या पदार्थामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे असेही म्हटले जाईल. यासाठीच आजची ही बातमी पूर्ण वाचा.

पचन क्रिया स्वास्थ्य असेल तर आपले आरोग्य देखील स्वास्थ्य राहते. कारण ९० टक्के आजाराचे मूळ कारणे पचनक्रियांशी संलग्न असते. मनुष्याचे शरीर स्वास्थ्य तेव्हाच राहते जेव्हा पचन व्यवस्थित असेल. पचनक्रिया चांगली राहण्यासाठी निरोगी आहार व विहार जीवनशैली चांगले असणे आवश्यक आहे. (Health Tips: Nothing eaten gets digested, it is necessary to make this change in daily routine)

digestion problem solution
Monsoon Session of Parliament: राज्यसभेत सुद्धा होणार धुमशान, थेट उपसभापतींना जारी केला व्हीप! नियम काय म्हणतो?

आरोग्याबाबत असे म्हटले जाते की पचनक्रिया बरोबर असेल तर अर्ध्याहून अधिक आजार दूर राहतात. अन्न नीट पचले नाही तर शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळत नाहीत, त्यामुळे तुमचे शरीर आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

प्रतिकारशक्ती कमकुवत झाली की अनेक आजार होण्याची शक्यता असते. पचनाशी संबंधित समस्या कायम राहिल्यास, आपल्या आहार आणि दैनंदिन दिनचर्येमध्ये बदल करणे खूप महत्वाचे आहे.

तुम्हाला सतत पोटात दुखणे आणि बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहिली तर त्यामागील कारण तुमची कमकुवत पचनसंस्था असू शकते. जर तुम्हालाही पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर दैनंदिन दिनचर्येतील काही छोटे बदल तुमच्या पचनशक्तीला बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरतील आणि तुम्हाला उत्साही वाटेल. (Health Care Tips)

digestion problem solution
Self Care Tips For Mental Health आयुष्यात मित्रमैत्रिणीच नाहीत? मग असे ठेवा स्वतःला आनंदी

कोमट पाणी

जर तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर रोजचा नियम करा की सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्या, ते तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि हळूहळू पचनक्रिया सुधारते.

नाश्ता स्कीप करु नका

बहुतेक लोकांची सवय असते की कामाच्या घाईत ते अर्धा अपूर्ण नाश्ता करतात किंवा चहा पिऊनच घराबाहेर पडतात, पण तुमच्या या सवयीमुळे पोटात गॅस होऊ शकतो. त्यामुळे रोज नाश्ता करण्याची सवय लावा आणि सकस नाश्ता करण्याचा प्रयत्न करा, रिकाम्या पोटी चुकूनही चहा पिऊ नये.

योग किंवा व्यायाम

स्वत:ला ऊर्जा देण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी, सकाळची सुरुवात योग किंवा व्यायाम, सायकलिंग, चालणे याने करा. यामुळे तुमची पचनक्रिया बरोबर होईल तसेच तुमच्या संपूर्ण शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील.(Yoga For Health)

digestion problem solution
Mental Health : कायम स्वत:ला दोष दिल्यास येऊ शकतं नैराश्य, या प्रकारे करा Depression दूर

रात्रीच्या जेवणासाठी हे नियम करा

रात्रीच्या जेवणात फक्त हलक्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते पचायला सोपे जाईल. खाणे आणि झोपणे यामध्ये सुमारे दोन तासांचे अंतर ठेवा, यासोबत जेवल्यानंतर काही वेळ चालण्याची सवय लावा.

आहार कसा असावा

निरोगी राहणे हे व्यक्तीच्या जीवनशैली आणि पौष्टिक आहारावर अवलंबून असते. पचनशक्ती चांगली राहण्यासाठी फळ, पालेभाज्या, फायबरयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. रोजच्या जेवणात जास्त मेदयुक्त पदार्थ खाऊ नये. त्यामुळे पचनक्रिया मंदावते.

digestion problem solution
Eye Health: या कारणांमुळे डोळ्यांची दृष्टी वेळेआधीच होतेय कमकुवत?,वेळीच लक्ष द्या!

पाणी किती प्यावे

शरीरासाठी पाणी हे अमृतासारखे आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. जर शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असेल तर पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो.

व्यसनाने बिघडते आरोग्य

खाण्यापिण्यासोबतच धूम्रपान- मध्यपान सेवन करू नये. कामातील ताणतणाव टाळावे. रोज तीन वेळा व्यवस्थित आणि वेळेवर जेवण करावे. प्रत्येकांनी व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()