Health Tips : पाणी पिताना ही चूक कराल तर आयुष्यातील पंधरा वर्ष होतील कमी!  

दररोज किती पाणी प्यावे?
Health Tips :
Health Tips : esakal
Updated on

Health Tips : आपल्या आहार शास्त्रात जेवण कसे असावे, हलके कि जड त्याची वेळ कशी असावी हे जसे सांगितले आहे. अगदी तसेच पाणी पिण्याच्या बाबतीतही काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. काही लोक जेवणासोबत पाणी पितात. तर काही जेवणाआधी.

जेवणासोबत पाणी पिण्याबाबत अनेक धारणा रुजू आहेत. काही लोक म्हणतात की जेवण्यापूर्वी पाणी पिणे चांगले आहे आणि काही लोक म्हणतात की जेवल्यानंतर पाणी पिणं योग्य आहे. त्याचवेळी, काही लोक आहेत जे याकडे अजिबात लक्ष देत नाहीत.

पण मग नेमकी कोणती पद्धत योग्य आहे किंवा पाणी पिताना कोणताही नियम पाळणे आवश्यक आहे? या विषयावर आयुर्वेदाचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

Health Tips :
Drinking Water Rules: चाळीशीतही चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग पाणी पिण्याचे हे नियम नक्की फॉलो करा

दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने वृद्धत्व हळूहळू येते आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा धोकाही कमी होतो. जर आपण योग्य प्रमाणात पाणी पीत राहिलो. तर जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यताही कमी होते. एका संशोधनानुसार, कमी पाणी प्यायल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे आयुर्मान 15 वर्षांनी कमी होऊ शकते.

आधीच्या संशोधनाच्या निकालांच्या आधारे, संशोधकांनी नोंदवले की कमी पाणी पिल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. त्यांनी उंदरांवर एक अभ्यास केला, ज्यामध्ये त्यांना कमी पाणी दिले गेले. त्यामुळे त्या उंदरांमध्ये प्रति लिटर सोडियमचे प्रमाण पाच पटीने वाढले आणि त्यांचे आयुष्य सहा महिन्यांनी कमी झाले. (Drinking Water)

मानवी जीवनावर आणि विशेषत: वृद्धापकाळावरही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो हे या अभ्यासातून सिद्ध होत आहे. वय संशोधनाचे निष्कर्ष सांगतात की उंदरांच्या तुलनेत मानवी आयुष्य 15 वर्षांनी कमी होऊ शकते.

Health Tips :
Health Tips : दुखणं-खुपणं आता विसरून जा! या फळाचा रस प्याल तर नसांमध्ये नवी ताकद संचारेल

संशोधक काय म्हणतात

मुख्य संशोधक नतालिया दिमित्रीवा यांनी सांगितले की, लवकर वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करू शकणारे उपाय शोधण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. हे आवश्यक आहे कारण वयाशी संबंधित रोग वेगाने विकसित होत आहेत.

संशोधनानुसार, दररोज पुरेसे पाणी प्यायल्याने जीवन रोगमुक्त होते. यामुळे शरीर निरोगी राहते, त्यामुळे म्हातारपण उशिरा येते, तुम्ही रोगविरहित दीर्घायुष्य जगू शकता. तपमान नियंत्रित करणे आणि त्वचेसाठी देखील हे महत्वाचे आहे.(Healthy Lifestyle)

दररोज किती पाणी प्यावे?

पुरुषांनी दररोज 3.7 लिटर (11-12 ग्लास) पाणी प्यावे.

महिलांनी दररोज 2.7 लिटर (8-9 ग्लास) पाणी प्यावे.

फळे आणि इतर पेये 20 टक्के पाण्याची कमतरता करतात.

Health Tips :
Health Tips चहासोबत या 5 गोष्टींचे सेवन चुकूनही करू नका, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

शरीरात पाणी कमी पडले तर काय होते?

  • कोरडी त्वचा

  • लघवी समस्या

  • हॅलिटोसिस

  • डोकेदुखी, सुस्ती

  • रक्त घट्ट होणे, ज्यामुळे हृदयावर परिणाम होतो

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

जेवणापूर्वी

आपल्यापैकी बर्‍याच जणांना जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्यायला आवडते जेणेकरून आपण जेवायला बसल्यावर कमी कॅलरीज पोटात जातील. पण प्रत्यक्षात जेवण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरते आणि जेवण कमी जाते.

Health Tips :
Water Supply Organization : राज्यातील पाणी पुरवठा संस्थांना मिळणार पूर्वीच्याच दराने वीज

जेवणानंतर

बरेच लोक जेवल्यानंतर पाणी पिण्याचा सल्ला देतात, यामागचं लॉजिक ते असं सांगतात की जेवल्यानंतर पाणी प्यायचं ठरवल्याने जेवण पोटभर होऊ शकते. पण तसे काहीही नसते. आयुर्वेदानुसार जेवणानंतर पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.

जेवताना

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आयुर्वेदानुसार जेवताना थोडे थोडे पाणी पिणे उत्तम आहे. हे खाल्लेल्या अन्नाचे मोठे-मोठे तुकडे लहान लहान आकारात तोडण्यास मदत करते, ज्यामुळे पचनसंस्थेला मदत होऊन अन्न सहज पचते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()