Cold Drinks : शुगर, कॅलरीज फ्री असूनही डाएट कोक 'सायलेंट किलर' का ठरतोय?

cold drink side effects: डाएट कोक प्यायल्याने हे आजारही लागतील मागे?, वेळीच बदला सवय
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

Health Tips : मधुमेही रोगींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लोकांनी सगळे पदार्थ शुगर फ्री घेण्यास सुरूवात केली आहे. तर, ज्यांना वजन कमी करायचं असते त्यांनीही गोड पदार्थांच्या जागी लो कॅलरी असलेले पदार्थ खाणं सुरू केलंय. पण, अशा पदार्थांमुळेच तुमच्या आरोग्याला हानिकारक परिणाम भोगावे लागणार आहेत.

तुम्ही शुगर फ्री कार्बोनेटेड ड्रिंक डाएट कोक बद्दल ऐकले असेल. अलिकडच्या वर्षांत खूप लोकप्रिय झाला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डायट कोक शुगर फ्री आणि कॅलरी फ्री असूनही त्याचे दुष्परिणाम का होतात?

या कोकमध्ये कृत्रिम साखर असते. या साखरेमुळे दात खराब होण्याचा आणि वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, डाएट कोकमध्ये अॅसिड आणि कॅफेन असते, ज्यामुळे दात किडणे, जलद हृदयाचे ठोके आणि उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो.

Health Tips
Sonia Gandhi Health News : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत अपडेट आली समोर

डायट कोक काय आहे?

कोकाकोलाच्या वेबसाईटनुसार, डायट कोक हे कंपनीचे पहिले शुगर फ्री ड्रिंक होते, जे 1983 मध्ये लाँच करण्यात आले होते. यानंतर २००६ मध्ये कोका-कोला झिरो लाँच करण्यात आले, जे २०१६ मध्ये बदलून कोका-कोला झिरो शुगर करण्यात आले.

चाचणीबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, दोन्ही पेये शुगर फ्री आणि कॅलरी-फ्री आहेत. पण कोका-कोला झिरो शुगर टेस्ट ही कोकाकोलाच्या मूळ चवीपेक्षा जास्त असते, तर डाएट कोकची चव वेगळी असते, जी सौम्य चव देते. (Sugar Free)

अनेक अभ्यास आणि आरोग्य तज्ञांनी त्याच्या सेवनाशी संबंधित संभाव्य आरोग्य धोक्यांवर चिंता व्यक्त केली आहे. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक कृत्रिम साखरेचे सेवन करतात त्यांना टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

Health Tips
Laughing Health Benefits: 'स्माईल प्लिज', हसल्याने तुमच्या आरोग्याला होतील हे फायदे, जाणून घ्या

फ्रेंच शास्त्रज्ञांनी 9 वर्षांपासून एक लाखाहून अधिक लोकांच्या आहाराचे आणि आरोग्याचे विश्लेषण केले. या अभ्यासात, तज्ञांना असे आढळून आले की जे लोक दररोज 16 ते 18 मिलीग्राम कृत्रिम साखरेचे सेवन करतात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता 69 टक्के जास्त आहे जे कमी प्रमाणात सेवन करतात. (Healthy Diet)

डाएट कोक सायलेंट किलर आहे?

काहीजण डाएट कोकला हेल्दी पर्याय मानतात, परंतु संशोधन आणि अभ्यासांनी त्याचे संभाव्य आरोग्य धोके हायलाइट केले आहेत. डाएट कोकमध्ये एस्पार्टम नावाची कृत्रिम साखर असते.

काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की एस्पार्टम डोकेदुखी, चक्कर येणे आणि काही जुनाट आजार होण्याचा धोका देखील असू शकतो.

Health Tips
Health Tips : हिंदू धर्मात बाळाचे कान का टोचतात? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे

डाएट कोक प्यायल्याने होणाऱ्या इतर समस्या

वजन वाढणे: कृत्रिम साखर भूक वाढवू शकते, ज्यामुळे तुम्ही अधिक खाऊ शकता. यामुळे वजन वाढू शकते.

हृदयरोग : कॅफिनमुळे हृदय गती आणि रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

झोपेच्या समस्या : कॅफिन झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते. यामुळे निद्रानाश आणि झोपेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. (Coke)

Health Tips
Health Care News: बटर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय म्हणतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.