Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला हवाय आरोग्यदायी पदार्थ, दही पोहे आहे बेस्ट ऑप्शन

तुम्ही नाश्त्यासाठी आरोग्यादायी पर्याय म्हणून दही-पोह्यांचा विचार करू शकता. ही हेल्दी रेसिपी कशी बनवायची हे पाहुया
Healthy Breakfast Recipe
Healthy Breakfast Recipeesakal
Updated on

Healthy Recipe :

तुम्ही दररोज नाश्ता करत असाल तर ही एक चांगली सवय आहे. कारण, जे आपल्या आरोग्याविषयी जागरूक आहेत त्यांना ही गोष्ट माहितीय की, दररोज नाश्ता हा केलाच पाहिजे. आहारशास्त्रात असं सांगितलंय की, नाश्ता भरपूर, दुपारचे जेवण थोडे कमी अन् रात्रीचे अति कमी असावे.

आहाराचा हा नियम जो कोणी पाळतो तो व्यक्ती निरोगी असतो. पण, तुम्ही नाश्त्याला काय खाता यावरही निरोगी जीवनाचा मूलमंत्र अवलंबून असतो. तुम्ही नाश्त्यासाठी आरोग्यादायी पर्याय म्हणून दही-पोह्यांचा विचार करू शकता. ही हेल्दी रेसिपी कशी बनवायची हे पाहुया. (Healthy Breakfast Recipe)

Healthy Breakfast Recipe
Crespi Vegetable Thalipith Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक कुळीथाच्या पीठाचे व्हेजिटेबल थालीपीठ, पाहा सोपा व्हिडिओ

साहित्य :

२ वाट्या जाडसर पोहे, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, ४ वाट्या गोड घट्ट दही, तूप अथवा रिफाईंड तेल, जिरे, कढीलिंब, हिंग, फोडणी, चवीनुसार मीठ व साखर, कोथिंबीर.

Healthy Breakfast Recipe
Diwali Recipe : इथं आहे पातळ पोह्यांच्या चिवड्याची परफेक्ट रेसिपी, चिवडा होईल अधिक चटकदार!  

कृती :

पोहे स्वच्छ निवडून घ्यावेत. दही घुसळून त्यात चवीनुसार मीठ, साखर, वाटलेली मिरची घालून तूप, जिरे, हिंग, कढीलिंबाची फोडणी घालून दही पोह्यावर घालावे. नीट कालवून कोथिंबीर घालून खाण्यास द्यावेत.

पोहे न धुता दह्यात घातल्याने चवीला सुरेख लागतात. खायला द्यायच्या आधी १० ते १५ मिनिटे पोहे दह्यात घालावेत म्हणजे मऊसर होतील. पोहे खूप जाड असले तर धुवून दह्यात घालायला हरकत नाही. मात्र खूप वेळ व जास्त पाण्यात धुवू नयेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.