गेल्या काही वर्षांपासून कामाचा वाढता ताण Work Load, धकाधकीचं जीवन, शाळा, कॉलेज किंवा ऑफिस सगळीकडे वाढत जाणारी स्पर्धा आणि जीवनशैली Lifestyle यामुळे मानसिक ताण वाढत चालला आहे. Healthy Diet Tips help to maintain Mental Health
गेल्या ५ वर्षामध्ये भारतात डिप्रेशन Depression म्हणजेच नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्यांचा अनेकांना सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी Long Life मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे.
निरोगी शरीरासोबत तुमचं मानसिक आरोग्य देखील चांगलं असल्यास अनेक आजारांवर मात करणं सहज शक्य होतं. तज्ञांच्या मते तुमच्या जीवनशैलीत Lifestyle योग्य बदल केल्यास आणि योग्य आहाराच्या मदतीने मानसिक आरोग्य Mental Health चांगलं ठेवणं शक्य आहे.
पौष्टिक आहार हा शारीरिक आरोग्य चांगलं राखण्यास फायदेशीर तर ठरतोच शिवाय यामुळे मानसिक आरोग्यदेखील सुधारतं. यासाठी आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यास नैराश्य आणि चिंता दूर होण्यास मदत होवू शकते हे जाणून घेऊयात.
धान्य आणि कडधान्य- आहारामध्ये धान्य आणि कडधान्यांचा समावेश करणं आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक तर मिळतात शिवाय यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. गुणकारी कार्बोहायड्रेट्स सोबतच अनेक पोषक तत्व असतात.
धान्य आणि कडधान्यांमुळे मेंदूला ट्रिप्टोफॅन शोषण्यास मदत होते. तसचं यातील काही पोषक गुणधर्मामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
हे देखिल वाचा-
पालक- पालक आणि हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पालकच्या सेवनामुळे मेंदूला गरजेचा असलेला फॉलिक ऍसिडचा पुरवठा होतो यामुळे नैराश्य आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
तसचं तणावामुळे झोप न लागण्याची समस्या असल्यास पालकचं नियमित सेवन करावं. अभ्यासानुसार, पालकामध्ये असलेली संयुगे वृद्धापकाळीतील डिमेन्शियाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
सुकामेवा- सुकामेवा हा शारीक आरोग्यासोबतच मेंदीसाठी देखील उपयुक्त मानला जातो. बदाम, अक्रोडमध्ये उपलब्ध असलेलं ओमेगा-३ फॅटी ऍसिड मेंदूसाठी उपयुक्त असून यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते.
हर्बल टी- हर्बल टीमध्ये मेंदूला पोषण देणारी अनेक पोषक तत्व आढलतात. हर्बल टीमध्ये ओवा, दालचिनी, काळीमिरी, तुळस आणि लनंग यांसारख्या पोषकतत्व असलेल्या घटकांचा वापर केला जातो.
भाज्या- आहारामध्ये ताज्या भाज्यांचा समावेश करणं ही आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरत. नैराश्याचा सामना करणाऱ्यांसाठी भाज्यांचं सेवन करणं नैराश्य कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.
मेंदू शांत राहण्यासाठी आणि मूड चांगला होण्यासाठी भाज्यांमध्ये उपलब्ध असलेले फायबर, फॉलेट आणि इतर पोषक तत्व मदत करतात. खास करून हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळणारं अल्फा-लिनोलेनिक ऍसिड हे मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरतं.
मासे- मासे हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा एक उत्तम स्त्रोत आहे. ओमेगा -3 फॅट्स मेंदूच्या आरोग्यासाठी गरजेचे असतात. मेंदूच्या सेरोटोनिनच्या कार्यासाठी ते गरजेचं असतं. खास करून रावस, बांगडा, कुपा, पेडवे या माशांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा-३ फॅट्स असल्याने माशांचं सेवन नैराश्य कमी कऱण्यासाठी मदत करू शकतं.
आहारामध्ये या पदार्थांचा समावेश केल्यास नैराश्य आणि चिंता दूर करण्यास मदत होईल. यासोबतच नैराश्याचा सामना करणाऱ्यांनी आहारात साखर, तसचं अल्कोहल आणि जास्त कॅफेन असलेल्या पदार्थांचा समावेश कमी करावा. या पदार्थांमुळे तुमच्या नैराश्यामध्ये वाढ होऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.