Healthy Food : मुलांना चॉकलेट अन् चिप्सपेक्षा या गोष्टी खाऊ घाला, बुद्धी आयुष्यभर राहील तिक्ष्ण!

मुलांसाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करू शकता याचा विचार करावा?
Healthy Food
Healthy Foodesakal
Updated on

Healthy Food :

आजकाल मुलांच्या खाण्याच्या वस्तू घेताना हमखास चिप्स, चॉकलेट्सचे बॉक्स घेतले जातात. मुलांना मधल्या वेळेत खायला काय द्यायचं तर चिप्स, नमकिन्स आणि चॉकलेट्सचा विचार केला जातो. तुमच्या घरातही पाच ते दहा वर्षाचं लहान मुल असेल. तर, तुम्ही ही गोष्ट नक्की वाचा.

आजकाल मुलांच्या खाण्याच्या सवयी अतिषय बिघडलेल्या आहेत. ज्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास तर दूरच उलट त्यांना अनेक गोष्टींचा त्रासच होत आहे. चिप्स खारट असतात त्यामुळे मुलांच्या वजनावर परिणाम होतोय. तर, मुलांच्या गोड खाण्यामुळे त्यांचे दात किडतात. काहीतरी खाऊन पोट भरूदेत म्हणून मुलांना स्नॅक्स दिले जातात. पण त्यामुळे बुद्धीचा विकास होत नाही.

Healthy Food
Healthy Breakfast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा अंड्याचा स्वादिष्ट पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

मेंदूच्या विकासासाठी सर्व प्रकारची पोषक तत्त्वे आवश्यक असली तरी काही गोष्टी अशा आहेत. ज्या मेंदूच्या विकासात आगीमध्ये इंधनासारखे काम करतात. निरोगी मेंदूच्या विकासासाठी, लहानपणापासून मुलांच्या आहारात कोलीन, फोलेट, आयोडीन, लोह, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, जसे की ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, प्रथिने, जीवनसत्त्वे ए, डी, बी6 आणि बी12, जस्त इत्यादींचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे

मुलांच्या मेंदूचा विकास करण्यासाठी तुम्ही त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करू शकता. पहिला सुपर फूड म्हणजे अंडी होय, अंड्यामध्ये त्या सर्व गोष्टी असतात ज्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतात. जर तुम्ही 8 वर्षापर्यंतच्या मुलाला दररोज 2 अंडी दिली तर ते त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

Healthy Food
Healthy Breakfast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा पालक पनीर पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

ओमेगा ३ फॅटी ॲसिड

लहान मुलांसाठी सीफूड अर्थात ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि ट्यूना, स्वॉर्डफिश, तिलापिया यांसारखे मासे नक्की द्या. फॅटी ऍसिड व्यतिरिक्त, ते प्रथिने, जस्त, लोह, कोलीन, आयोडीन इत्यादींनी समृद्ध असतात जे त्यांच्या मेंदूच्या विकासास मदत करतात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या म्हणजे पालक, काळे इत्यादींमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फोलेट असते ज्यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि शिकण्याची क्षमता वाढते. अशा परिस्थितीत मुलांना त्यांच्या आहारात किमान एक कप पालेभाज्या द्यायलाच हव्यात.

Healthy Food
Healthy Food : हिवाळ्यात आजारी पडण्यापासून वाचवेल गुळाची चिक्की, घरी बनवायलाही आहे सोप्पी

दही

मुलांना दही खूप आवडते. तुम्ही ताजे दही तयार करून त्यांना देऊ शकता. दही मेंदूच्या विकासात तसेच न्यूरोलॉजिकल प्रक्रिया सुधारू शकते. एवढेच नाही तर मुलांमध्ये आयोडीनची कमतरता देखील दूर करू शकते.

ड्रायफ्रूट्स

मुलांना ड्रायफ्रूट्स देखील द्यावेत. हे मेंदूच्या विकासासाठी खूप उपयुक्त आहे. त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, जस्त, ओमेगा ३ फॅटी ॲसिड इत्यादी असतात, ज्यामुळे मेंदूची शक्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते आणि शिकण्याची क्षमता वाढते.

Healthy Food
Winter Food Recipies : हिवाळ्यात खायलाच हवेत पोह्याचे कटलेट्स आणि काकडीचे पोहे, जाणून घ्या रेसिपीज

बीन्स

मुलांच्या आहारात विविध प्रकारच्या बीन्सचा समावेश करणे मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात जस्त, प्रथिने, लोह, फोलेट, कोलीन इ. तुम्ही सोयाबीन आणि राजमा, तसेच भोपळीच्या बियांचाही वापर केला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.