Healthy Food :  केवळ बदाम नाहीतर भिजवलेले काजू खाण्याचेही आहेत अनेक फायदे, प्रयोग करून तर पहा

काजू भिजवून का खावेत याचं करेक्ट उत्तर आहे हे
Healthy Food
Healthy Foodesakal
Updated on

Healthy Food :

तूम्ही अनेकवेळा ऐकले असेल की चांगल्या फायद्यांसाठी बदाम भिजवून खाल्ले पाहिजेत. बदामाचा उपयोग केल्याने बुद्धी चांगली होते. आपल्या तब्बेतीतही सुधारणा होते.पण तुम्हाला माहिती आहे का, की भिजवलेले काजू खाण्याचेही आहेत अनेक फायदे.

उन्हाळ्यात कोकण पट्ट्यात गेलात की हमखास काजूच्या बागा, टपोरी लाल पिवळी फळं आपलं लक्ष वेधून घेतात. गोवा भागात तर काजूला विशेष मागणी आहे. काजूच्या बागांमध्ये बनवली जाणारी फेणी प्रसिद्ध आहे. काजू तसे परवडणारा पदार्थ नसला तरी देखिल ते खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Healthy Food
Cashew Scheme : काजू उत्पादक, उद्योजकांना मोठा दिलासा; कोल्हापुरातील तीन तालुक्यांचा 'या' योजनेत समावेश

दिवसात १५ ते १८ काजू खाऊ शकता. काजू तुमच्या हृदयाचे कार्य सुरळीत राखण्यात मदत करते. एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की, जे लोक नियमित काजूचे सेवन करतात. त्यांच्यामध्ये खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते.

केवळ कोलेस्टेरॉल नाहीतर काजूमध्ये असेलले हाय मॅन्गिशिअममुळे हृदयरोगांपासूनही बचाव होतो. तर चला जाणून घेऊयात काजू खाण्याचे आणखी काय फायदे आहेत ते.

- काजू खाण्याचे अनेक फायदे आहेत कारण ते अनेक पोषक तत्वांनी युक्त असतात. त्यात पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनोइड्स सारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Healthy Food
Cashew Benefits: मधुमेह ते Weight Loss; हिवाळ्यात काजू खाण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

- बदामासारख्या ड्रायफ्रुट्सप्रमाणे काजू भिजवून खाणे देखील फायदेशीर मानले जाते. याशिवाय भिजवलेल्या काजूमध्ये सुक्या काजूपेक्षा जास्त फायबर असते, जे आपल्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासातूनही आपली सुटका करते.

- कॅल्शियम, लोह, फायबर आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध, भिजवलेले काजू आपल्या शरीराला हे पोषक तत्व सहजपणे शोषण्यास सक्षम करतात. हाडे मजबूत ठेवण्यासोबतच ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

- काजूमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

Healthy Food
जगभरात Cashew ला चांगली मागणी ।पाहा व्हिडीओ

- भिजवून काजू खाल्ल्याने आपल्या शरीरात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे पोषक तत्वे वाढतात.

- भिजवलेले काजू खाल्ल्याने आपल्या मेंदूचे आरोग्य वाढते, ज्यामुळे वाढत्या वयाबरोबर स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशी निरोगी राहतात.

Healthy Food
Soaked Cashews : दूधात काजू भिजवून खाण्याचे आरोग्यदायी फायदे

काजू भिजवूनच का खावेत

काजूमध्ये भरपूर फायटिक ॲसिड असते, ज्यामुळे ते सहज पचत नाही. त्यामुळे काजू भिजवल्याने त्यातील फायटिक ऍसिड कमी होते आणि ते पचण्यास सोपे होते. या ॲसिडमुळे पोटाशी संबंधित अनेक समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे भिजवणे हा एक चांगला पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.