Healthy Food : पुर्वीच्या काळात लोक वाड्यात रहायचे. तेव्हा अंगणातच मोठ्या रांजणात ताक हालवून लोणी काढले जायचे. हे रांजण पाहुणच त्याकाळात किती सुबत्ता होती हे लक्षात येतं. तुम्ही असे चित्र श्रीकृष्णावरील मालिकांमध्ये नक्कीच पाहिले असेल.
घरोघरी आजही स्त्रिया लोणी काढतात. पद्धत बदलली असली तरी लोणीही चांगलं निघतं हे विशेष. पण आता लोणी खाणंच बंद झालं आहे. लोक म्हणतात, लोणी खाल्ल्याने वजन वाढतं, ते बेचव लागतं. त्यामुळे बेकरीत मिळणाऱ्या लोण्याला जास्त मागणी आहे. पण हे घरातलं लोणी कि बाहेर मिळणारं बटर यापैकी तुमच्या आरोग्याला काय फायदेशीर आहे. याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
बटरचं नाव काढलं की लोकांना ब्रेड बटर आठवतं. काही लोकांच्या दिवसाची सुरूवात ब्रेड बटर खाऊनच होते. लहान मुलांच्या डब्यातही बटरचा समावेश असतोच. पण या बटर पेक्षा अधिक पौष्टीक आणि आरोग्यासाठी फलदायी लोणी आहे, हे आपले आजी आजोबा सांगतात. आपोण त्याकडे दुर्लक्ष करतो. सर्वात आधी जाणून घेऊयात लोणी आपल्यासाठी फायद्याचं आहे का? (Healthy Food : Home made white butter or yellow butter with bread, know whose consumption is better and why)
घरात आणल्या जाणाऱ्या फ्रेश दुधापासून दही अन् त्यापासून लोणी बनवलं जातं. त्यामुळे यात काही भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बरं ह्या लोण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे अगदी नैसर्गिक आहे. ज्यांची त्वचा खरखरीत, कोरडी आहे त्यांच्यासाठी लोणी मॉइश्र्चरायझरप्रमाणे काम करते. रोज लोण्याने चेहऱ्याचा मसाज केला तर त्याचा भरपूर फायदा मिळतो.
गावाकडील लोक आजही गुढगे आणि सांधेदुखीचा त्रास होत असेल तर लोण्याचा वापर करतात. दुखणाऱ्या गुढग्यावर लोणी लावून मालिश केल्याने हाडांचे कार्य सुरळीत सुरू राहते. असा त्याचा आरोग्यासाठीही फायदा होतो.
या लोण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, लोण्यापासून बनलेलं ताजं तूपही अनेक दिवस टिकतं. तूपाचा वापर रोजच्या पदार्थात केल्याने आरोग्य सुधारण्यास मदतच होते.
बटरचा विचार केला तर त्यांच्या रंगात असलेला बदलही आपल्याला डिस्टर्ब करतो. कारण, लोण्याचा पिवळा रंग हा त्यात असलेल्या फॅट्समुळे येतो. लोण्यात असलेले फॅट्स आपल्याला हळूहळू आजारी पाडतात. हे बटर अधिक वेळ राहते याचे कारण आहे.
बटरमध्ये असलेले मीठ. आरोग्यदायी शरीरासाठी मिठाचे प्रमाण कमी ठेवा असे सांगण्यात येते. पण बटरमध्ये असलेलं मीठ फक्त वेगळी चवं देतं. त्यातून वेगळा काही फायदाच होत नाही.
बटरवर प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे त्याचं आयुष्यही वाढतं. पण, या प्रक्रियेच्या क्रियेमुळे त्यात फॅट आणि कॅलरी दोन्ही वाढतात. जर तुम्हाला हे बटर रोजच खायला आवडत असेल. तर सावध रहा कारण हे बटर तुमच्या शरीरातील सोडीयमची पातळी वाढवतं. (Healthy Food)
लोणी कि बटर?
आता या सर्व गोष्टी वाचून तुम्हाला समजले असेल की, कोणत्या पदार्थाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. लोणी आरोग्यासाठी चांगले असते कारण त्यात ओमेगा-३, व्हिटॅमिन ए आणि ई असते. या सर्व गोष्टी डोळ्यांचे आरोग्य, मेंदूचे आरोग्य आणि तुमच्या हाडांसाठी फायदेशीर आहेत.
लोणी जास्त काळ फ्रेश केस ठेवाल?
लोणी जास्तवेळ फ्रेश राहत नाही. याचं कारण म्हणजे ते आंबट पदार्थापासून बनते. दही जरी आपण जास्तवेळ ठेवलं तरी ते जास्त आंबट होतं. त्यामुळे लोणी काढल्यानंतर तुम्ही ते फ्रिजरला ठेऊ शकता. फ्रिजरमध्ये लोणी घट्ट बनतं आणि ते अनेक दिवस राहू शकतं.
तुम्हाला जेव्हा ते लागणार असेल तेव्हा ते फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. आणि मऊ झाल्यानंतर वापरता येतं. (Butter)
फ्रिज नसेल तर..
लोणी फ्रिजशिवायही फ्रेश राहू शकते. जर तुम्हाला दुसऱ्यादिवशी लगेच लोणी लागणार असेल तर ते पाण्यात घालून ठेवा. लोण्याचा गोळा पाण्यात राहीला तर २४ तास फ्रेश राहू शकतो. तुम्हाला ब्रेडवर लावायचे असेल तर तुम्ही लोणी थोड मॅश करून त्यावर मीठ शिंपडून किंवा बारीक साखर घालून खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.