Healthy Food : कंटाळवाण्या दिवसाला करा रिफ्रेश; ऑफीसच्या बॅगेत नेहमी ठेवा हे हलके फुलके पदार्थ!

फळे, ड्रायफ्रूट्स यांसारख्या गोष्टी कामाच्या ठिकाणी वेगळी उर्जा देतात
Healthy Food
Healthy Foodesaka
Updated on

Healthy Food : ऑफीसमध्ये सकाळी येणारे कर्माचारी दिवस संपत आला की अगदी आळसाने भरलेले असतात. कधी एकदा घरी जातो आणि सोप्यावर निवांत पडतो त्यांना असं वाटत असतं. दिवसभर केलेलं काम, प्रवास त्यात वातावरणातील बदल त्यामुळे ऑफीसमध्ये बसून राहणं एक अवघड काम वाटतं.

दिवसभराच्या कामाच्या ठिकाणी जास्त कामामूळे ताणतणाव येणे सामान्य आहे. त्यामुळे लोकांच्या उत्पादकतेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. काही लोक ऑफिसमध्ये कँडीज, चिप्स, कॉफी आणि शीतपेये घेऊन समाधान मानतात. अर्थात या गोष्टी खायला छान लागतात. ते तुमची भूक शांत करतात. पण यामुळे आरोग्याचे अधिक नुकसान होऊ शकते.( These snacks will increase work productivity in office, include them in daily diet)

Healthy Food
Healthy Street Foods: स्ट्रीट फूड खाण्यास घाबरताय? 'हे' 10 हेल्दी स्ट्रीट फूड करा ट्राय

फळे, ड्रायफ्रूट्स आणि सॅलड यांसारख्या गोष्टी कामाच्या ठिकाणी उत्पादकता वाढवतात. याशिवाय ते आवडीने खाल्ल्याने एनर्जी लेव्हल चांगली राखण्यास मदत होते. येथे आम्ही तुम्हाला त्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे कामाच्या ठिकाणी तुमची उत्पादकता वाढवतील.

बदाम

खाण्यात आरोग्यदायी पदार्थांचा विचार केला तर बदामाचे नाव सर्वात आधी डोळ्यांसमोर येईल. हेल्दी फॅट्स आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध बदाम फोकस वाढवण्यास मदत करतात. बदामामध्ये असलेले प्रथिने तुम्हाला रिफ्रेशही करतील आणि तुमची भूकही भागवतील. (Almond)

केळी

रोज एक केळी खाल्ल्याने आपल्या शरीराची उत्पादकता वाढते. यामुळे तुम्हाला ऍक्टीव्ह रहायला मदत मिळते. केळी खाल्ल्याने शरीरात आवश्यक प्रमाणात ग्लुकोज उपलब्ध होते. केळी फोकस आणि एनर्जी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कार्ब्स तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्याचा अनुभव देतात.

Healthy Food
Healthy Food : इरेक्शनपासून शक्तीपर्यंत; या एका पदार्थाच्या सेवनाने पुरुषांना मिळतात अनेक फायदे

मखाना

मखाना एक हेल्दी स्नॅक्स म्हणून ओळखले जातात. यामध्ये हेल्दी फॅट्स आढळतात. मखाना हे मधुमेही आणि हृदयरोगींसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही. मखनाची चव वाढवण्यासाठी ते तुपात तळूनही करता येतात. (Makhana)

सोया नट्स

वाळलेल्या सोयाबीनपासून कुरकुरीत आणि स्वादिष्ट सोयानट्स बनवले जातात. ते फायबर, वनस्पती प्रथिने आणि इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. ते वजन कमी करणे, हृदय आणि हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. सॅलड व्यतिरिक्त ते बेक करून देखील खाऊ शकतात. हे खाल्ल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.

Healthy Food
Healthy Food Receipe: गोड खावसं वाटतं आहे? ट्राय करा हा गव्हाचा केक

ऑफिसमध्ये कंटाळा येत असेल तर हे करा

पूर्ण झोप घ्या

तुम्हाला ऑफिसमध्ये कंटाळा येत असेल, सतत जांभई येत असेल तर तुमची झोप झाली नाही असे समजा. दिवसभर फ्रेश रहायचे असेल तर सोपा उपाय आहे की तुम्ही तुमची पूर्ण झोप घ्या.

व्यायामासाठी वेळ काढा

दिवसभर फ्रेश आणि ऍक्टीव्ह रहावं, सगळ्यांनी आपलं कौतुक करावं असं वाटंत असेल तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलली पाहिजे. तुमच्या दिवसाच्या शेड्युलमध्ये एक्स्जरसाईजचा समावेश करा. सकाळी एक तासभर केलेला व्यायाम तुम्हाला वेगळीच उर्जा देईल. (Healthy Food)

चहाच्या ऐवजी हे प्या

तुम्ही दिवसाची सुरूवात चहाने करत असाल. तर ते आत्ताच थांबवा. चहा पिऊन केवळ गोड चव मिळते. त्यामुळे दिवसभर फ्रेश रहायचे असेल तर तुम्ही ग्रीन टी, किंवा कॉफी प्यायला सुरूवात करा. कॉफीमध्ये कॅफिन असतं. ज्यामुळे बॉडीला इस्टंट एनर्जी मिळते. त्यामुळे तुम्हाला झोप येत असेल तर कॉफी प्या. त्यामुळे तुमची झोप जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.