Health Tips for Women: हेल्दी राहण्यासाठी महिलांनी रोज ही १० कामं करणं गरजेचं

जर महिलांनी स्वत:ला काही सवयी जडवून घेतल्या तर तिचा निरोगी Healthy राहणं शक्य आहे. यासाठी रोजच्या दिनचर्येत महिंलांनी पुढील काही सवयींचा विचार करणं गरजेचं आहे
Health Tips for Women
Health Tips for WomenEsakal
Updated on

आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याही प्रत्येत क्षेत्रात आपलं नाव कामावत आहेत. गृहिणी असो वा नोकरदार महिला एकाच वेळी ची मुलं, घर, सासू सासरे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते. खरं तर प्रत्येक स्त्री ही एक सुपरवुमन आहे असं म्हणायला हरकत नाही. Healthy Life Tips for Women in Marathi

खरं तर एकाच वेळी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी स्त्री Women सक्षम असते. मात्र याच जबाबदाऱ्या सांभाळत असताना ही सुपरवुमन Superwomen स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते आणि त्यामुळेच बऱ्याचदा तिला अंथरूण पकडावं लागतं.

त्यामुळेच जर महिलांनी स्वत:ला काही सवयी जडवून घेतल्या तर तिचा निरोगी Healthy राहणं शक्य आहे. यासाठी रोजच्या दिनचर्येत महिंलांनी पुढील काही सवयींचा विचार करणं गरजेचं आहे.

कमी ताण घेणे- तज्ञांच्या मते महिला अधिक विचार आणि ताण घेतात. याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होत असतो. करियर आणि जबाबदाऱ्या यामुळे ताण येणं सहाजिक आहे. मात्र ताण घेतल्याने समस्या सुटत नाही.

यामुळे तुम्ही तणावात असाल तर त्या विषयावर तुमचा जोडीदार, कुटंब किंवा जवळच्या मित्रीणीसोबत चर्चा करा आणि मनं मोकळं करा. तणाव घेतल्याने वंध्यत्व, नैराश्य आणि हृदयासंबंधीत समस्या निर्माण होतात.

तणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा योगा करा. तसचं म्युझिक थेरपी म्हणजेच तुमची आवडती गाणी ऐकून तुम्ही ताण कमी करू शकता.

अधिक पाणी पिणे- कामाच्या गडबडीमध्ये अनेक महिला कमी पाणी पितात. मानवी शरीरात ६० टक्के पाणी असतं. याचाच अर्थ तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांना योग्य प्रकारे काम करण्यासाठी पाण्याची गरज भासते.

यासाठीच दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या तर दूर होतील. शिवाय त्वचा तजेलदार राहण्यास मदत होईल,.

७-८ तासांची झोप घ्या- अनेक महिला या घरातील कामं, अभ्यास किंवा मुलांमुळे रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठातात.

पुरेशी झोप न झाल्याने शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेच आहे. ७-८ तासं झोप घेतल्यास शरीर आणि मेंदू पुन्हा रिसेट होण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

Health Tips for Women
Pranayama for Healthy Lungs : नक्की प्राणायम केल्याने आपल्याला फायदा होतो का?

हेल्दी खाण गरजेचं- ट्रेंडमधील डाएट किंवा जंक फूड खाणं अनेकांना आवडतं. मात्र या पदार्थांच्या अति सेवनाने शरीराला हानी पोहचते. यासाठीच महिनांनी सकस आहार घेणं गरजेचं आहे. रोजच्या आहारामध्ये फळं, भाज्या, धान्य तसचं ब्राऊन राईस आणि ओट्स अशा पोषक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. 

तुमच्या शरिराचं ऐका- अनेकदा आजारी होण्याआधी कोणच्या ना कोणत्या लक्षणांमधून आपलं शरीर आपल्याला सिग्नल देतं असतं. मात्र यासाठी आपल्या शरीराचं ऐकणं गरजेचं आहे.

खूप थकवा आला असेल किंवा एखादा त्रास होत असेल तरी काम करत राहू नका. कामाच्या दबावामुळे जेवणाची वेळ निघूण जाणार नाही याकडे लक्ष द्या. यासाठी थोडाजरी त्रास जाणवत असेल तर आराम करा आणि वेळेत डॉक्टरकडे जा. 

नियमित चाला- महिला त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्वत:च्या फिटनेसकडे दूर्लक्ष करतात. यामुळेत सांधेदुखी, कंबरदुखी किंवा वजन वाढल्याने महिलांमध्ये इतर आजार वाढण्याची शक्यता असते.

फिट राहण्यासाठी जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. यासाठी दररोज किमान अर्धा तास वॉक करा. सकाळी किंवा रात्री जेवल्यानंतर वॉक करणं फायदेशीर ठरू शकतं.

विटामिन आणि मिनरल्स असलेला आहार घ्या- पुरुषांच्या तुलनेत महिलामध्ये विटामिन आणि मिनरल्सची कमतरता जाणवते. यासाठीच आहारात विटामिन आणि मिनरल्सचा समावेश असेल याकडे लक्ष द्या. कॅल्शियम, विटामिन डी, फॉलेट, आयरन, विटामिन सी, विटामिन बी १२ आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. 

वर्षातून एकदा हेल्द चेकअप- तज्ञांच्या सल्ल्यानुसार महिलांनी वर्षातून एकदा डॉक्टरांकडू योग्य तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. खास करून २१ आणि त्याहून पुढील वयोगटातील महिलांनी दर ३ वर्षातून एकदा सर्वायकल कॅन्सरच्या तपासणीसाठी पॅप टेस्ट करून घ्यावी. ३० ते ६५ वयोगटाली महिलांनी किमान ५ वर्षातून एकदा तरी पॅट टेस्ट आणि एचपीव्ही टेस्ट करणं गरजेचं आहे. 

महिन्यातून एक ब्रेक घ्या- नोकरदार महिला असो किंवा गृहिणी रोजच्या कामातून आणि सर्व जबाबदाऱ्यांमधून महिन्यातून किमान १ दिवस स्वत:साठी वेळ द्या.

रविवारची सुट्टी असो किंवा सणसूद महिला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतातच. यासाठीच एक दिवस ब्रेक घ्या. या दिवशी मैत्रिणींसोबत किंवा एखादा सिनेमा पाहिला जा. पार्लरमध्ये जाऊन फेशियल, हेड मसाज अशा पद्धतीने थोडं रिलॅक्स होणं गरजेचं आहे.  यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाट्टेल. 

आनंदी रहा- सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदी आणि कायम पॉझिटिव्ह रहा. कोणतही समस्या किंवा त्रास असेल तर कुटुंबासोबत त्यावर चर्चा करा. कुटुंबासोबत आनंद साजरा करा. 

महिलांनी रोजच्या आयुष्यात या काही सवयी आचरणात आणल्या तर त्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.