Healthy Snacks : चहासोबत बिस्किट नाही, तर हे पदार्थ खा, लो कॅलरी स्नॅक्सचे भन्नाट ऑप्शन्स!

अशा प्रकारचे बिस्किट खाऊन तुमचे वजन थोडेही वाढणार नाही
Healthy Snacks
Healthy Snacks esakal
Updated on

Healthy Snacks :

संध्याकाळी गरम चहा पिण्याचा आनंद वेगळाच असतो. यामुळे दिवसभराचा आळस आणि थकवाही दूर होतो. काही लोकांना चहासोबत काहीतरी खाण्याची सवय असते. बहुतेक लोक चहासोबत स्नॅक्स, बिस्किटे किंवा काही तळलेले पदार्थ खातात.

या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वजनही वाढू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ले तर ते वजन कमी करण्यातही मदत करू शकते. चला तर मग या लेखात चहासोबत खाण्याचे काही आरोग्यदायी स्नॅक्सचे पर्याय जाणून घेऊया.

Healthy Snacks
Tea with Snacks : चहासोबत स्नॅक्स खाताय? मग 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या

चहासोबत हे कमी कॅलरी असलेले हेल्दी स्नॅक्स खा

मखाना

चहासोबत स्नॅक्स घेण्यासाठी मखना हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही चाट बनवून खाऊ शकता किंवा मखना कोरडा भाजूनही खाऊ शकता. एक कप मखाना चाटमध्ये फक्त 100 कॅलरीज असतात. याचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही. याशिवाय भरपूर प्रमाणात पोषक असल्याने ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

गव्हाची बिस्किट

आपण बहुतेक चहासोबत मैद्याची बिस्किटे खातो, ज्यामुळे आपल्या आरोग्यालाही हानी पोहोचते. त्याऐवजी तुम्ही घरी बनवलेल्या गव्हाच्या पिठाची बिस्किटेही खाऊ शकता. पिठापासून बनवलेल्या बिस्किटांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते स्नॅकिंगसाठी देखील एक आरोग्यदायी पर्याय आहेत. 

Healthy Snacks
Snacks For Diabetics:  मधुमेहाच्या रूग्णांना द्या हाच नाश्ता, झटक्यात रक्तातली साखर वितळते की नाही पहाच!

भेळ पुरी

चहाच्या वेळी काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर भेळ पुरी खाऊ शकता. हे भाज्या आणि निरोगी स्नॅक्ससह तयार केले जाते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही.

सूजी रस्क

रव्यापासून बनलेल्या रस्कमध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे तो चहासोबत खाण्याचा उत्तम पर्याय बनतो. शिवाय, ते पोट भरणारेही असते, त्यामुळे याच्या सेवनाने लवकर भूक लागत नाही. आपण एका वेळी 1-2 रस्क खाऊ शकता. दोन रस्कमध्ये सुमारे 80 कॅलरीज असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. 

Healthy Snacks
Winter Health Care : सांभाळा... हिवाळ्यात हृदयविकाराचा वाढतो धोका

पॉपकॉर्न  

चहासोबत स्नॅकचा पर्याय म्हणून पॉपकॉर्नही घेऊ शकता. मक्याच्या दाण्यापासून तयार केलेला हा नाश्ता तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मखनाच्या एका वाटीतून तुम्हाला केवळ 35 कॅलरीज मिळतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही ते फायदेशीर आहे.

या गोष्टींचा आस्वाद तुम्ही चहासोबत घेऊ शकता. या गोष्टींमध्ये कॅलरीजचे प्रमाणही कमी असते, त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. पण हे लक्षात ठेवा की चहामध्ये गोडवा आणण्यासाठी साखरेऐवजी आरोग्यदायी पर्यायही निवडावा.

Healthy Snacks
Healthy Snacks: पावसाळ्यात पकोडे नाही तर हे टेस्टी स्नॅक्स खा, चवीसोबत आरोग्यही राहिल चांगले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.