निसर्गात सापडणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी फायदेशीर आहे. आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि इतर औषधं, वस्तूंकडे आकर्षित होतो. सध्या होणाऱ्या साथीच्या आजारात आलं, हळदीचा काढा रामबाण ठरतो. पण आपण आधी औषधांचा विचार करतो. आणि तरीही फरक नाही पडला तर आयुर्वेदीक औषधांकडे वळतो.
तुम्ही सिताफळ खाल्ले असेल, त्यापासून बनलेली बासुंदी सुद्धा आवडीने खाल्ली असेल. तसच, सिताफळापासून बनलेला चहा ही आयुर्वेदीक फायदे देणारा आहे. सिताफळामध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.