Body Wash: जर तुम्ही बॉडी वॉश वापरतायं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Body Wash: शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक लोक साबण तर बॉडीवॉश वापरतात. पण बॉडीवॉश वापरणे किती फायदेशीर आणि तोट्याचे आहे हे जाणून घेऊया.
Body Wash:
Body Wash: Sakal
Updated on

Body Wash: शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक लोक साबण तर बॉडीवॉश वापरतात. नियमितपणे आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ राहते. पण शरीर स्वच्छता न ठेवल्यास अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होऊ शकतात. तसेच त्वचेसंबंधित आजार वाढू शकतात. प्रत्येकाने दिवसातून एकदा चांगली आंघोळ केली पाहिजे. लोक अनेक वर्षांपासून आंघोळीसाठी साबण वापरत आहेत, परंतु बदलत्या काळानुसार यामध्येही बदल होताना दिसत आहेत.

आता अनेक लोक साबणाऐवजी बॉडी वॉश वापतात. तुम्हाला बाजारात प्रत्येक त्वचेच्या प्रकारानुसार बॉडी वॉश मिळतील तर साबणाच्या बाबतीत असे होत नाही. जर तुम्ही नियमितपणे आंघोळीसाठी साबणाऐवजी बॉडी वॉशचा वापर करत असाल तर आधी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.

बॉडीवॉशचे फायदे

बॉडी वॉशमध्ये त्वचेला आर्द्रता देणारे अनेक घटक असतात. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. बॉडी वॉशचा नियमित वापर केल्याने तुमच्या त्वचेची आर्द्रता टिकून राहते.

बॉडी वॉशमध्ये अनेक सुगंधी घटक असतात. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेत. उष्ण आणि दमट हवामानातही तुम्हाला ताजेतवाने वाटते. पण साबणाला जास्त सुगंध नसतो.

बॉडी वॉश नेहमी बाटलीत बंद राहतो. त्यामुळे अस्वच्छ हात त्याला लागत नाही. तो बंद असल्याने त्यावर कोणत्याही प्रकारच्या जंतूंचा प्रादुर्भाव होत नाही.

काही बॉडी वॉशमध्ये स्क्रब कण असतात. जे डेड स्किन काढून टाकून एक्सफोलिएशन म्हणून काम करतात. त्वचा आणखी उजळ करतात. तुम्ही स्क्रबसाठी बॉडी वॉश देखील वापरू शकता.

Body Wash:
Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

बॉडीवॉशचे तोटे कोणते

बाजारात अनेक प्रकराच्या मिळणाऱ्या बॉडीवॉशमध्ये केमिकल,सल्फेट, पॅराबेस असतात. ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर याची तपासणी करून वापर करावा. बॉडीवॉश खरेदी करताना त्यातील घटक तपासावे. साबणाच्या तुलनेत बॉडीवॉश अधिक महाग असतो. यामुळे तुमच्यावर खर्चाचा भार वाढू शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.