Why Craving Chocolate So Much Read Reasons: अनेक लोकांना गोड खावेसे वाटते. काही लोकांचे गोड खाण्यावर नियंत्रण राहत नाही. कधी गोड, खारट किंवा तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेक वेळा पीएमएस, मासिक पाळी किंवा गरोदरपणात महिलांना वेगवेगळ्या पदार्थांची खायची इच्छा असते.
हे हार्मोनल असंतुलनामुळे होते आणि सामान्यतः पूर्णपणे सामान्य असते. पण, रोजच्या जीवनात तुम्हाला कोणत्याही खाद्यपदार्थाची वारंवार क्रेविंग होत असेल, तर त्यामागील कारणे समजून घेतली पाहिजेत. अनेकांना चॉकलेट खूप आवडते आणि अनेकदा चॉकलेट खाण्याची इच्छा असते. पण चॉकलेट खाण्याची क्रेविंग का होते आणि यामागे कोणते कारणे आहेत हे जाणून घेऊया.