अभिनेता पुनीत राजकूमार, सिद्धार्थ शुक्ला, सिंगर केके यांचा गेल्या दोन वर्षात मृत्यू झाला. या सर्वांमध्ये दोन गोष्टी कॉमन होत्या. एक म्हणजे ते मनोरंजन क्षेत्राशी संबंधित होते. आणि दुसरे म्हणजे त्यांचा मृत्युचे कारण एकच होते. ते म्हणजे हार्ट अटॅक.
सिद्धार्थ शुक्ला, केके आणि पुनीत फिट आणि फाईन होते. त्यांचे वयही असे नव्हते की त्यांचे हृदयविकाराने निधन होईल. पण, तरीही त्यांचे काय चुकलं हेच माहिती नाही. तूम्हीही फिट राहण्यासाठी मेहनत घेत असाल तर काय काळजी घ्यावी हे पाहुयात.
होय, हे धक्कादायक असलं तरी सत्य आहे. अभिनेत्री सुश्मिता सेनलाही अटॅक आला. सुश्मिता सेननं २ मार्च ला चाहत्यांसोबत आपल्याला हार्ट अटॅक येऊन गेल्याची बातमी दिली. त्यातून तिची एन्जियोप्लास्टी झाली आहे.
सुश्मिता सेन सारखेच नेते, अभिनेते यांचा फिटनेस, त्यांची लाईफस्टाईल इतरांपेक्षा अधिक चांगली असते. त्यांचे डायटही स्टेबल असते. ते आपल्यासारखं आरबट-चरबट खात नाहीत. तरीही त्यांच्यात हार्ट अटॅकचे प्रमाण अधिक का आहे? असा प्रश्न तूम्हालाही पडला असेल ना? याच प्रश्नाचे उत्तर न्युट्रिशनिस्ट डॉ.मृदूल कुंभोजकर यांनी दिले आहे. त्यांचे यावर काय मत आहे जाणून घेऊयात.
तूम्ही शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या फिट असला तरी हार्ट अटॅक येणं ह्याला बरीच कारणं आहेत. हार्ट अटॅक आला किंवा त्याने एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीबद्दल चर्चा होते. त्याला एखाद्या गोष्टीचं टेंशन होतं, त्यातच तो झुरत होता. त्यामूळेच त्याला अटॅक आला, अशी चर्चा होते.
पण, प्रत्यक्षात तसं खरंच आहे का? तर नाही. डॉ.मृदूल याबद्दल म्हणतात की, काहीवेळेला या गोष्टी मल्टीफॅक्टोरियल यामूळेही घडू शकतात. तर, काहीवेळा हार्ट अटॅक येण्याला बीपी, रक्तातील साखरेचे प्रमाणही कारणीभूत असते. त्यामूळे शरीर केवळ फिट आणि फिगर मेंटेन ठेऊन उपयोग नाही. तर, ते आजारांपासून सावध ठेवणेही गरजेचे आहे.
डॉ. मृदूलचा लाखमोलाचा सल्ला
आपल्या शरीरात दिसणाऱ्या किरकोळ गोष्टींचे रूपांतर हार्ट अटॅकमध्ये होतं. अशा मोठ्या आजारात रूपांतर होताना आपलं शरीर सतत सिग्नल्स देत असतं. सिग्नल्स ओळखून त्यावर योग्य ते औषोधोपचार करा. कारण, मला काहीच होत नाही, असं म्हणून दुर्लक्ष करू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.