Heart Attack Symptoms : पुरूषांना आणि महिलांना येणाऱ्या Heart Attack मध्ये काय फरक असतो? लक्षणं वेगळी असतात की सारखीच?

पुरुष आणि महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका वेगळा असतो का?
Heart Attack Symptoms
Heart Attack Symptoms esakal
Updated on

Heart Attack Symptoms : महिला आणि पुरूषांच्या शरीराची रचना वेगळी असते. त्यामुळेच त्यांना होणाऱ्या आजारांची लक्षणेही वेगवेगळी असतात का? असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. आता हृदयविकाराचच घ्या ना, हृदयविकाराची लक्षणे दोघांमध्येही एकसारखी नसतात. त्यात काय फरक असतो, याबद्दल आपण आज जाणून घेऊयात.

अनेक दिवसांपासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, हृदयविकाराच्या झटक्याची सर्व लक्षणे जाणून घेणे महत्वाचे आहे. परंतु, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये भिन्न असतात आणि दोघांनाही वेगळी जाणवू शकतात.

त्यामुळे या दोघांमधील लक्षणांमधील फरक, हार्ट अटॅक येण्याआधी महिलांमध्ये कोणती लक्षणे दिसतात आणि ती पुरुषांपेक्षा कशी वेगळी असू शकतात हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

Heart Attack Symptoms
Attack By Drone : हल्ल्यांसाठी होतोय सर्रास ड्रोनचा वापर; युक्रेनने सहा प्रांतांना ड्रोन हल्ल्याने केले लक्ष्य

पुरुष आणि महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका का वेगळा असतो

फुफ्फुस आणि मेंदूपासून ते स्नायू आणि सांधे यांच्या शरीर रचनेमुळे पुरुष आणि स्त्रिया भिन्न असतात. पुरुष आणि स्त्रियांच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीमध्ये देखील फरक आहे.

पुरुषांपेक्षा स्त्रियांची हृदये आणि रक्तवाहिन्या लहान असतात. तर, पुरुषांचे हृदय मोठे असते आणि त्यांच्या रक्तवाहिन्या मोठ्या असू शकतात. या फरकांमुळे, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयविकार वेगळ्या प्रकारे विकसित होऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका येतो जेव्हा नसांमध्ये कोलेस्टेरॉल प्लेक जमा होतो आणि रक्तवाहिन्यांना नुकसान होते. पुरुषांमध्ये, हा प्लेक सहसा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो.

स्त्रिया हृदयाच्या सर्वात लहान रक्तवाहिन्या, ज्याला मायक्रोव्हॅस्क्युलेचर म्हणतात त्यामध्ये ही वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोघांचे हार्ट अटॅक वेगळे आहेत. (Heart Attack)

Heart Attack Symptoms
Heart Attack : हृदयविकाराचा झटका आलेल्या दहा वारकऱ्यांचे प्राण वाचविण्यात यश

पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे अनेक प्रकारे भिन्न असू शकतात.

- अति घाम येणे

- छातीत दुखणे

- घसा आणि तोंड दुखणे

- श्वास घेण्यास त्रास होणे

- छातीत जळजळ होणे आणि अस्वस्थता (Heart Attack Symptoms)

Heart Attack Symptoms
Minor Heart Attack : अपूर्ण झोप तुम्हाला देऊ शकते हृदयविकाराचं गिफ्ट, वेळीच काळजी घ्या!

महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे काय असतात?

स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे हृदयाशी संबंधित समस्यांपेक्षा पोटाशी संबंधित समस्यांसारखी अधिक जाणवू शकतात. जसे

- अॅसिड

- तणाव आणि चिंता

- मळमळ

- अपचन

- श्वासोच्छवासाचा त्रास आणि लवकर थकवा

- चक्कर येणे

- निद्रानाश.

त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळे सुरुवातीलाच वेळेवर उपचार मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()