Heart Care Tips: टोमॅटो ही एक भाजी असून पोषक घटकांनी समृद्ध आहे. यामध्ये अनेक जीवनसत्वे, खजिने आणि अँटीऑक्सीडंट्स असतात. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच शरीरातील कोलेस्टॉल नियंत्रणात राहते.
टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि त्वचा निरोगी ठेवते. तसेच व्हिटॅमिन के हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
टोमॅटोमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि लोह यासारखे घटक आढळतात. तसेच तज्ज्ञांच्या मते टोमॅटोचा रस कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले लाइकोपीन, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
टोमॅटोचा रस बनवणे सोपा असून आरोग्यदायी आहे. हा रस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे हे जाणून घेऊया.