Heartburn Home Remedies : छातीत होणाऱ्या जळजळीने त्रस्त आहात?, हे घरगुती उपाय देतील तात्काळ आराम

तुमची ही समस्या अन्नप्रणालीला डॅमेज करत आहे
Heartburn Home Remedies
Heartburn Home Remediesesakal
Updated on

Heartburn Home Remedies : अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा छातीत जळजळ सुरू होते. ही एक सामान्य समस्या आहे जी बऱ्याच लोकांना त्रास देते. वास्तविक, अन्न पचनाच्या प्रक्रियेत, आपले पोट असे ऍसिड तयार करते जे अन्न पचण्यास मदत करते. पण कधी कधी हे अॅसिड जास्त प्रमाणात तयार होते त्यामुळे छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो.

यासाठी लोक सहसा औषधे घेतात. पण काही घरगुती उपायांनीही आपण छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करू शकता. अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत .चला तर मग जाणून घेऊ या. 

आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकदा लोक छातीत जळजळ होत असल्याची लोक तक्रार करतात. छातीत जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. सामान्यत: जास्त आम्लयुक्त पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होते.

Heartburn Home Remedies
Acidity Pain : ॲसिडिटी कशामुळे होते? सततच्या ॲसिडिटीवर औषधे नको तर या मसाल्याचे करा सेवन!

परंतु काही लोकांना घरी हलके अन्न खाल्ल्यानंतरही ही समस्या उद्भवते. छातीत जळजळ होण्याला वैद्यकीय भाषेत अॅसिड रिफ्लक्स म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया छातीत जळजळ झाल्यास कोणते घरगुती उपाय करावेत.

ऍसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे. मात्र ही समस्या जर सतत जाणवत असेल तर ही मोठी गोष्ट आहे. कारण तुमची ही समस्या अन्नप्रणालीला डॅमेज करत आहे. आणि यामुळेच कॅन्सरची जोखीम वाढत असते.

अशा समस्यांवर वेळेच उपचार करावेत जेणे करून तुम्हाला आराम मिळू शकतो. यासोबतच आपल्या लाइफस्टाइलमध्ये महत्वाचे बदल करणे गरजेचे आहे.

स्लीप फाउंडेशनच्या मते, आपल्या डाव्या बाजूला पडून राहणे किंवा झोपणे हे छातीत जळजळ कमी करण्यास मदत कर शकते. यासह जीईआरडीच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

Heartburn Home Remedies
Acidity झाल्यास दूध प्यावे की नाही?

यामुळे केवळ जळजळच कमी होत नाही तर अन्ननलिकेचा पोटातील आम्लाचा संपर्कही कमी होतो. याउलट, पाठीवर झोपणे किंवा पडून राहणे यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.

अनेकांना वेळोवेळी छातीत जळजळ होते. यामागे अनेकदा कोणतेही स्पष्ट कारण नसते. परंतु हृदयाच्या जळण्याची शक्यता वाढवणाऱ्या घटकांमध्ये कॉफी, टोमॅटो, अल्कोहोल, चॉकलेट आणि फॅटी किंवा मसालेदार अन्न, लठ्ठपणा, धूम्रपान, गर्भधारणा, तणाव आणि चिंता, हार्मोन्सची वाढ, हर्निया यांचा समावेश होतो.

छातीत जळजळ होत असेल तर काय करावे?

हार्ट बर्नच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी थंड लस्सी किंवा ताक प्या.

आहारात दह्याचा समावेश करा.

पपई खाल्ल्याने छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

मुळा खाल्ल्याने आराम मिळेल.

केळी खाल्ल्याने ही बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.

आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

आल्याचा चहा बनवून पिऊ शकता.

थंड दूध प्यायल्यास तात्काळ आराम मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.