एक्सरसाइज करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे तर प्रत्येकालाच ठाऊक आहे. आजारांना दूर पळवून लावायचं असेल आणि फिट राहायचं असेल तर एक्सरसाइज Exercise गरजेचे आहेत. नियमित एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम करणाऱ्या व्यक्ती आजारी पडल्या तरी त्या आजारातून लवकर बऱ्या होतात हे आपण अनेकदा पाहिलं आहे. Heavy exercise may cause harm consult your doctor
आपण अनेक सेलिब्रिटींचं Celebrity उदाहरण पाहिलं असेल. मोठ मोठ्या आजारांचा सामना केल्यानंतरही अनेक सेलिब्रिटी अवघ्या काही दिवसात फिट Fit दिसू लागतात. नुकतच उदाहरण घ्यायचं झालं तर अभिनेत्री सुष्मिता सेनला Sushmita Sen हार्ट अटॅक आला होता. तिने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला. सुष्मिता सेन कायमच फिटनेसकडे लक्ष देते हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. कदाचित यामुळेच तिला लवकर रिकव्हर होता आलं.
मात्र सुष्मिता सेन व्यायाम आणि मेडिटेशनवर भर देत असल्यामुले तिला हार्ट अटॅकमधून सावरणं थोड सोपं गेलं. मात्र सुष्मिता सेनच्या डॉक्टरांसोबतच अन्य काही डॉक्टरांच्या मते रोज आणि जास्त प्रमाणात एक्सरसाइज करणं हे शरीरासाठी घातकही ठरू शकतं. सुष्मिता सेनचे डॉक्टर असलेले कार्डियोलॉजिस्ट राजीव भागवत यांच्या मते जीममध्ये जाऊन जास्त प्रमाणात एक्सरसाईज करणंही नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच एक्सरसाइज करणं गरजेचं आहे.
आठवड्यातून किती दिवस करावी एक्सरसाइज
कार्डियोलॉजिस्ट राजीव भागवत यांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून ३ ते ४ दिवसच एक्सरसाइज करायला हवेत. रोज एक्सरसाइज करू नये. इक्सरसाइजनंतर शरीराला व्यायामाच्या ताणातून रिकव्हर होण्यासाठी म्हणजेच सावरण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. जर शरीराला सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळालाच नाही, तर तुम्हाला व्यायाम करण्याचा फायदा मिळणार नाही. पुरेशी झोप न घेता आणि आराम न करता लतत व्यायाम केल्याने हार्मोन्सचं नियंत्रण बिघडतं. यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होवू शकतात.
हे देखिल वाचा-
जास्त जिम करणं धोकादायक
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जिम करतानाही लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जास्त जिम करू नये. तसचं दररोज ७-८ तासांची झोप घेऊनच जिम करावी. अनेक तरुण केवळ क्रेझ किंवा फॅशन म्हणून जिममध्ये जातात. तर फॅशन म्हणून जिममध्ये न जाता सक्रिय आणि फिट राहण्यासाठी जिममध्ये जाणं हा उद्देश असावा.
तसंच नव्याने एक्सरसाइज सुरु करणाऱ्यांनी किंवा मोठा गॅप घेऊन सुरु करणाऱ्यांनी विषेश काळजी घेणं गरजेची आहे. जिम करताना ट्रेनरच्या मदतीने योग्य ती काळजी घेऊनच एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तसचं एक्सरसाइज सुरु करण्यापूर्वी वाॅर्मअप करणं हे आवश्यक आहे. वाॅर्मअप न करताच थेट वर्कआउटला सुरुवात करू नये.
यासोबतच अनेकदा तुमची शारीरिक रचना, तुमचं वजन, आरोग्य विषयक समस्या तसचं तुमचं लक्ष्य काय आहे. यावरही किती दिवस आणि किती वेळ एक्सरसाइज करावी हे अवलंबून असतं. ज्यांचं वजन नियंत्रणात आहे केवळ फिट राहण्यासाठी जिम करत आहेत. त्यांच्यासाठी आवड्यातून ३-४ दिवस हे पुरेसे असतात. तर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून ५-६ दिवस व्यायाम करणं गरजेचं आहे. मात्र हे करत असताना योग्य डाएट आणि पुरेसा आराम करणंही आवश्यक आहे.
जर तुम्ही खुप दिवसांनंतर एक्सरसाइजला सुरुवात करत असाल तर कमी एक्सरसाइजपासून सुरुवात करा. एका रिसर्चनुसार आठवड्यातून एक ते दीड तासांची हाय इंटेंसिटी एक्सरसाइजदेखील आरोग्यासाठी पुरेशी आहे. अर्थात हे तुम्ही दिवसभरात किती सक्रिय आहात यावर अवलंबून आहे. शिवाय एथलिट किंवा खेळाडूंना जास्त तास एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. मात्र सामान्य व्यक्तींनी केवळ ४५ मिनिटे ते १ तास व्यायाम करणं पुरेसं आहे. जास्त व्यायाम करणं हे हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं.
एक्सरसाइज करताना या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं
जिममध्ये वर्कआउटला सुरुवात करण्यापूर्वी वार्मअप करणं अत्यंत गरजेच आहे Warm up before workout. अनेकजण वार्मअप न करताच ट्रेडमिलवर जलदगतीने पळण्यास सुरुवात करतात. यामुळे तुमचा हार्टरेट अचानक वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोलॅप्स होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आधी वर्कआउट करावा. याशिवाय अनेक तरुण सिक्सपॅक्स किंवा नवे ट्रेंड पाहूण त्यांच्या शारीरिक क्षमतेहून अधिक वेस्ट उचलतात. त्यासोबतच एक तासांहून जास्त वेळ किंवा काही वेळा दिवसातून दोनदा वर्कआउट करतात. असं करणं कालांतराने हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं. वर्कआउटचे नवे ट्रेंड फॉलो करण्याआधी त्यातील जोखिम आणि तुमची क्षमता याचा विचार नक्की करा.
जिममधील वर्कआउट म्हणजे केवळ व्यायाम नव्हे
इक्सरसाइजचा अर्थ केवळ जिममध्ये जाऊन हेवी वेटस् उचलणं आणि ट्रेडमिलवर पळणं नव्हे हे लक्षात घ्यायला हवं. एक्सरसाइज म्हणजेच फिजिकली एक्विट असणं. तुम्ही किती सक्रिय आहात यावर तुमचा फिटनेस अवलंबून असतो. फिट राहण्यासाठी तुम्ही सायकलिंग, स्विमिंग, गार्डनिंग, वॉकिंग किंवा योगा, झुंबा डान्स असे इतरही पर्यायांची निवड करू शकता. यामुळे तुमचं मानसिक संतुलनही चांगलं राहतं. Exercises for physical and mental Health.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.