स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाचे उपकरण फ्रीज साफ करण्याच्या 'या' आहेत सोप्या पद्धती. यामुळे तुमचा रेफ्रिजरेटर पुन्हा नवीन व चकचकीत दिसू लागेल.
घर वर्षभर स्वच्छ ठेवलं जातं, पण दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने प्रत्येक कानाकोपराही स्वच्छ होतो. खोल्यांपासून ते पंखे, स्वयंपाकघरात ठेवलेले मसाल्यांचे बॉक्स, उपकरणे हा देखील साफसफाईचाच एक भाग आहे. परंतु, काही वेळा योग्य माहिती नसल्यामुळे त्यांना चमकवायला खूप वेळ लागतो, म्हणून आज आम्ही स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाचे उपकरण रेफ्रिजरेटर साफ करण्याची सोपी पद्धत सांगत आहोत. यामुळे तुमचा रेफ्रिजरेटर पुन्हा नवीन व चकचकीत दिसू लागेल.
हिवाळा असो किंवा उन्हाळा, या सर्व हवामानात आवश्यक असणारे उपकरण म्हणजे रेफ्रिजरेटर आहे. जर तुम्ही घरामध्ये रेफ्रिजरेटर वापरत असाल तर ते देखील नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे.
अशी करा रेफ्रिजरेटरची साफसफाई
भांड्यांच्या साबणाने आणि कोमट पाण्याच्या मिश्रणाने फ्रीज हलक्या हाताने धुवा. त्यानंतर रेफ्रिजरेटरच्या आतील भाग स्वच्छ करण्यासाठी सात भाग पाणी आणि एक भाग बेकिंग सोडा यांचे मिश्रण वापरू शकता. या मिश्रणाने रेफ्रिजरेटरचे आतील भाग वरपासून खालपर्यंत पुसून टाका, नंतर कोरड्या टॉवेलने आतील बाजू कोरड्या करा.
रेफ्रिजरेटरचा बाहेरील भाग स्वच्छ करण्यासाठी ऑल पर्पज क्लीनर वापरू शकता. यानंतर बाहेरील भाग टॉवेल किंवा कोरड्या कापडाने पुसून टाका.
काचेचे शेल्फ काढताना आणि साफ करताना, शेल्फ खोलीच्या तपमानावर असल्याची खात्री करा. जर तुम्ही थंड ग्लास गरम पाण्याने स्वच्छ केलात तर तडकण्याची शक्यता असते.
फ्रीजच्या दाराभोवती रबर गॅस्केट काळजीपूर्वक स्वच्छ करा. तसे ते नियमितपणे साफ करणे आवश्यक आहे. सामान्य घाण काढण्यासाठी कोमट पाणी आणि लिक्विड डिश सोप वापरू शकता. जर बुरशी दिसली तर तुम्ही ब्लीच-आधारित क्लीनर वापरू शकता. साफ केल्यानंतर चांगले वाळवा. नंतर पेट्रोलियम जेलीचा पातळ थर लावा.
फ्रीजच्या आतून दुर्गंधी येऊ नये म्हणून खालच्या शेल्फवर बेकिंग सोडा कॅनचा एक उघडा बॉक्स ठेवा. हे दुर्गंधी टाळण्यास मदत करते.
होममेड क्लीनर बनवण्यासाठी स्प्रे बाटलीमध्ये व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. त्याच्या मदतीने आपण रेफ्रिजरेटर नियमितपणे स्वच्छ करू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.