स्वतःसाठी कम्फर्टेबल 'ब्रा' ची निवड कशी कराल?

ब्राची साइज मोजण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या
Bra Size
Bra Sizeesakal
Updated on
Summary

तुम्हीही या समस्येतून जात असाल तर या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील.

महिलांमधील अर्ध्याहून अधिक तरुणी आणि महिला चुकीच्या आकाराचे ब्रा वापरतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे काही महिलांना त्यांच्या योग्य साइजची ब्रा खरेदी (Bra Size) करता येत नाही आणि त्यांना स्वत:चे योग्य साइज समजत नाही. ऑनलाइन खरेदी केलेला ब्रा साइज मध्ये नसेल तर तो परत पाठवण्याचा त्रास कोणी घ्यायचा, या विचाराने अनेक महिला फक्त चुकीच्या आकाराची ब्रा वापरतात. यामुळे अनेकदा महिलांना अस्वस्थ वाटू लागतं. तुम्हीही या समस्येतून जात असाल तर या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील.

Bra Size
महिलांनो या 4 प्रकारच्या ब्रा ठरु शकतात धोकादायक?

ब्राची साइज मोजण्याची योग्य पद्धत...

- पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बँडची साइज मोजावी लागेल. बँड साइज म्हणजे तुमच्या बस्टचा तळ जिथे ब्रा बँड केली जाते. बँडची साइज इंच टेपने मोजा.

- आता बस्टची साइज म्हणजे स्तनाचा भाग मोजा.

- बँडची साइज (Bust Size) ही तुमच्या ब्राची साइज असेल आणि स्तनाचा भाग मोजल्यास तुमच्या कपची साइज समजेल.

- कपची साइज माहिती करुन घेण्यासाठी बस्ट साइजमधून बँडची साइज वजा करा. उदा., जर बँडची साइज 36 असेल आणि ब्राची साइज 39 असेल तर 39-36 = 3 इंच. 3 म्हणजेच C. तुमच्या ब्राची साइज 36 सेमी. असेल.

- जर बँड साइजचा (Band Size) नंबर विषम असेल, जसे की 37, 39 किंवा 41, तर नेहमी एक साइज मोठा घ्या आणि ती संख्या बरोबर आहे असे समजा, जसे की 41 असेल, तर तुम्ही 42 बँड साइजची ब्रा खरेदी करु शकता.

- अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ब्राची नेमकी साइज समजेल.

Bra Size
Bridal Bras: ब्राइडल ड्रेससह चुकीची ब्रा वापरल्यास लूक होईल खराब!

या गोष्टींची काळजी घ्या.

- स्वत:च्या साइजची ब्रा घाला.

- खूप सैल किंवा घट्ट ब्रा देखील बऱ्याचप्रकारे आरोग्यावर वाईट परिणाम करतात.

- प्रत्येक ब्रँडचा साइज चार्ट (Bra Size Chart)वेगवेगळा असू शकतो. नवीन ब्रँडकडून ब्रा खरेदी करण्यापूर्वी नेहमी साइज चार्ट तपासा.

- कोणत्या फॅब्रिकखाली कोणती ब्रा घालायची याची काळजी घ्या. टी-शर्ट आणि टॉपवर घातली जाणारी ब्रा वेगवेगळी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.