Hidden Camera : लांबच्या प्रवासादरम्यान विसावा घेण्यासाठी बरेच लोक हॉटेलमध्ये थांबतात. मात्र हॉटेलमध्ये थांबताना तुमच्या गोपनीयतेची आणि सुरक्षेची काळजी घेणेही खूप महत्वाचे ठरते. अनेकदा आपण हॉटेलच्या छुप्या कॅमेराबाबच्या बातम्या वाचत असतो. अशावेळी आपल्या मनात हॉटेलमध्ये थांबताना सुरक्षिततेबाबत अस्वस्थता निर्माण होऊ शकते. मात्र प्रत्येक हॉटेलमध्ये असे छुपे कॅमेरे असतीलच असं नाही. मात्र त्याची खात्री करून घेणेही तेवढेच महत्वाचे असते. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.
हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी हे काम करा
हॉटेलच्या रूममध्ये हिडन कॅमेरा असल्यास कसा शोधायचा?
हॉटेल रूम बुक केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला कुठे कॅमेरा दिसतोय का ते शोधा. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काही पद्धती वापरू शकता. लपलेला कॅमेरे शोधण्यासाठी, सर्वप्रथम, हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच सर्व लाइट बंद करा. त्याच वेळी, खिडक्या, दरवाजे आणि पडदे देखील नीट करा. खोलीत पूर्ण अंधार पडल्यावर फोनचा फ्लॅश लाईट चालू करा आणि त्यादरम्यान खोली सर्व बाजूंनी शोधा. खोलीत कुठेही लपलेला कॅमेरा असल्यास, त्याचा प्रकाश चालू होईल आणि तो लगेच दिसेल.
फोन कॅमेरासह चेक करा
लपवलेले कॅमेरे हल्ली एवढे लहान असतात की ते शोधणे कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत, तुम्ही आणखी एक सोपी पद्धत अवलंबू शकता ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फोनचा कॅमेरा चालू करावा लागेल. फोन कॅमेरा चालू केल्यानंतर, सर्वकाही तपासा. कुठेही लहान ठिपके दिसले तर लगेच हॉटेल मॅनेजरला विचारा.
मोबाइल ब्लूटूथ सुरू करा
रिपोर्ट्सनुसार, हॉटेल रूममध्ये लावलेला कॅमेरा ब्लूटूथने ऑपरेट केला जातो. तुम्हाला हॉटेलच्या खोलीबद्दल काही शंका असल्यास, मोबाइल फोनचे ब्लूटूथ चालू करून तपासा. (restaurants)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.