High Cholesterol: शरीरात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यास अंडी खावी की नाही? जाणून घ्या तज्ञांचे मत

High Cholesterol: अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात. पण काही शरीरात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यास अंडी खाणे किती फायदेशीर असते हे जाणून घेऊया.
High Cholesterol| Egg
High Cholesterol| EggSakal
Updated on

high Cholesterol why should not eat egg read expert tips

अंडी खाणे आरोग्यदायी असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात देखील अंडी खातात. एका अंड्यामध्ये सुमारे 78 कॅलरीज असतात. अंड्यांमध्ये प्रथिने, हेल्दी फॅट्स, पोटॅशियम, सोडियम, कार्बोहायड्रेट यासारखे घटक असतात.

अंड्यातील पिवळ बलकामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी12, सेलेनियम इत्यादी पोषक घटक असतात. अंड्यामध्ये सुमारे 186 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे अनेक लोकांचा असा विश्वास आहे की यामुळे हृदयविकार होऊ शकतो आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते.

शरीरातील कॉलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. हाय कॉलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांनी अंडी खावीत की नाही हे जाणून घेऊया.

ब्लड कॉलेस्ट्रॉल आणि डायट्री कॉलेस्ट्रॉलमधील अंतर

आपल्या शरीरात आढळणाऱ्या कॉलेस्टेरॉलला ब्लड कॉलेस्टेरॉल म्हणतात. आपल्याला अन्नातून जे कॉलेस्टेरॉल मिळते त्याला डायट्री कोलेस्टेरॉल म्हणतात. ब्लड कॉलेस्टेरॉलला चांगले कॉलेस्ट्रॉल किंवा एचडीएल असेही म्हणतात.

शरीरात वाईट कॉलेस्टेरॉल देखील आहे, जे यकृताद्वारे तयार केले जाते आणि ते मेणासारखे चरबीयुक्त पदार्थ आहे. परंतु जेव्हा शरीरातील रक्तातील कॉलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त होते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्टेरॉल जमा होऊ लागते आणि त्यामुळे हृदयाकडे होणरा रक्तप्रवाहात अडचणी येतात. यामुळे छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

High Cholesterol| Egg
Cooking Tips: उन्हाळ्यात सरबत बनवताना 'या' चुका टाळा

हाय कॉलेस्टॉलमध्ये अंडी खावी की नाही?

तज्ज्ञांच्या मते, हाय कॉलेस्टेरॉल असलेले लोक अंडी खाऊ शकतात. पण अशा लोकांनी अंड्याचे मर्यादित सेवन करावे. अंड्यांमध्ये आहारातील कॉलेस्टेरॉल असते. आहारातील कॉलेस्टेरॉल - मांस, सीफूड, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते.

तुम्ही अंडी खाल्ल्यास तुम्हाला एचडीएल आणि एलडीएलच्या पातळीत थोडा फरक दिसू शकतो. तज्ज्ञांचे असे मत आहे की आपले शरीर कॉलेस्टेरॉल स्वतःच तयार करते. त्यामुळे आहारातील कॉलेस्टेरॉल मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.

तज्ज्ञांचे मत आहे की अंड्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण निरोगी आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.

हाय कोलेस्ट्रॉल असल्यास किती अंडी खावी?

अनेक लोक 1 ते 2 अंडी खाऊ शकतात. जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर सकस आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. याशिवाय आहारात कड धान्याचा समावेश करावा. जर तुम्हाला हाय कॉलेस्ट्रॉलची समस्या असेल तर सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे सेवन कमी करावे. जर हाय कॉलेस्ट्रॉलची असेल तर तुम्ही आठवड्यातून फक्त 4 ते 5 अंडी खावीत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.