Historical Forts In Kokan : कोकणात फक्त समुद्रकिनारेच नाहीत, तर ऐतिहासिक गडकिल्लेही आहेत..एकदा नक्की भेट द्या

Historical Forts In Kokan : समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळांसोबतच महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले पाहण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते.
Historical Forts In Kokan
Historical Forts In Kokanesakal
Updated on

Historical Forts In Kokan : महाराष्ट्राला अतिशय सुंदर निसर्ग, दऱ्याखोऱ्या, ऐतिहासिक किल्ले, विलोभनीय समुद्रकिनारे आणि यासोबतच समृद्ध करणारा इतिहास लाभला आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात पाहण्यासाठी बरेच काही आहे. महाराष्ट्रात दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक भेट देतात.

समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळांसोबतच महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले पाहण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. कोकणातील समुद्रकिनारे पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. परंतु, कोकणात नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक किल्ले देखील आहेत. आज आपण कोकणातील या खास अन् ऐतिहासिक असणाऱ्या काही किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

Historical Forts In Kokan
Maharashtra Travel : थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले..! महाराष्ट्रातल्या ‘या’ समुद्रकिनाऱ्यांची बातच न्यारी, कुटुंबासोबत नक्की भेट द्या

जयगड किल्ला

रत्नागिरी जिल्ह्यात हा जयगड किल्ला स्थित आहे. या किल्ल्याला विजय किल्ला असे ही म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात जवळपास १३ एकर क्षेत्रात हा किल्ला पसरलेला आहे. ६ व्या शतकातील हा किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून २० किमी अंतरावर हा किल्ला स्थित आहे.

हा किल्ला पहायला गेल्यावर तेथील लाईटहाऊसला नक्की भेट द्या. महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. या किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला अथांग समुद्रकिनाऱ्याचे विलोभगनीय दृश्य दिसेल. जर तुम्ही कोकणात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर, या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या. (Jaigad Fort)

कुलाबा किल्ला

अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या २ किमी अंतरावर असणारा हा किल्ला पर्यटकांना भुरळ घालतो. कुलाबा हा किल्ला चारही बाजूंनी अथांग अशा समुद्रकिनाऱ्याने वेढलेला आहे. विशेष म्हणजे हा किल्ला ३०० वर्षे जुना आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला आहे.

हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला बोटीने जाण्याची गरज नाही. तुम्ही अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यापासून चालत म्हटले तरी त्या किल्ल्यावर सहज पोहचू शकता. निसर्गप्रेमींसाठी हा किल्ला म्हणजे एक पर्वणीच आहे. ३०० वर्षे जुन्या असलेल्या या किल्ल्याचे काही अवशेष आणि बुरूज सध्या शिल्लक आहेत. तुम्ही जर कोकणात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर, या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या. (Kulaba Fort)

Historical Forts In Kokan
Summer Vacation Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत बजेट-फ्रेंडली ट्रीप प्लॅन करायचीय? मग, 'ही' ठिकाणे करा एक्सप्लोअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.