शर्मिला शिंदे
छंद म्हटले तर गार्डनिंग, वाचन, प्रवास, स्वयंपाक करणे अशा अनेक गोष्टी समोर येतात. याशिवाय आपल्या आवडत्या गोष्टींचे संकलन करणे हा देखील एखाद्याचा छंद असू शकतो. असाच किराणामाल, भाजीपाल्याच्या मनसोक्त खरेदीचा छंद माझा आहे. थोडे हसू येईल; परंतु या छंदामध्ये मी रमते आणि मनसोक्त खरेदीचा आनंद घेते. अगदी कायम माझ्याजवळ असलेला हा छंद आहे.