Holi 2022 : होळी खेळताना जपा डोळे! या पाच गोष्टी लक्षात ठेवा

होळी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे
Holi eye care
Holi eye care
Updated on

होळी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. यावेळी कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने लोकांमध्ये होळी खेळण्याचा उत्साह आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे होळी खेळण्यासाठी प्लॅनिंग सुरू झाले आहे. बाजारात लहान मुलांच्या पिस्तुल्स, पाण्याचे फुगे, गुलाल आदी गोष्टी पाहायला मिळत आहे.त. त्यामुळे यावर्षीची होळी दणक्यात होणार आहे. बाजारात वापरलेल्या रंगाचा तुमच्या त्वचेवर, केसांवर तसेच डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे होळी खेळताना डोळ्यांची काळजी घेणंही गरजेचं आहे.

Holi eye care
होळी खेळताना Mobile, Gadgets ची अशी घ्या काळजी!
Holi eye care
Holi eye care

ही काळजी घ्या

१) सनग्लासेस वापरा- रंगापासून डोळ्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहेय यासाठी झिरो पावरचा चष्मा किंवा गॉगल वापरा. सनग्लासेस वापरल्यामुळे रंग थेट डोळ्यांमध्ये जाण्याची शक्यता कमी असते. तसेच नुकसानही कमी होऊ शकते.

२) नैसर्गिक रंग वापरा- खेळताना नैसर्गिक रंग वापरल्याने शरीराला विशेषतः डोळ्यांना इजा होणार नाही. फुले आणि हळदीपासून बनवलेले रंग आजकाल मिळतात. त्यामुळे हा पर्याय वापरून होळी खेळा.

३) कॉन्टॅक्ट लेन्स घालू नका - कॉन्टॅक्ट लेन्स घालताना अधिक काळजी घेणे गरजेचे असते. जेव्हा रंग डोळ्याच्या आत येतात तेव्हा ते कॉन्टॅक्ट लेन्समध्ये अडकण्याची भिती असते.

Holi eye care
Holi Beauty Tips : होळी खेळताना केसांची अशी घ्या काळजी
Holi eye care
Holi eye care

४) डोळे चोळू नका- डोळ्यांमध्ये रंग जाणे साहजिक आहे. असा रंग गेल्यास डोळ्यात जळजळू शकते. काहीवेळा खाज येऊ शकते. अशावेळी कापसाच्या किंवा कॉटनच्या कापडाने हळू डोळे स्वच्छ करा, जमल्यास ड्रॉप्स टाका. यामुळे डोळ्यातील रंग सहज निघून जाईल.

५) तेल लावा- होळी खेळण्याआधी चेहरा आणि डोळ्याला तेल लावा. तेल लावल्याने रंग लवकर निघतो, तुम्ही मोहरीचे तेल, नारळाचे तेल यासाठी वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.