Holi 2024 : घाणीत,कचऱ्याच्या बाजूला उगवणाऱ्या एरंडाच्या झाडालाच होळीत जाळण्याचा मान का?

अनेक वर्षांपासून एरंडाचे झाड होळीत मध्यभागी उभे केले जाते
Holi 2024
Holi 2024 esakal
Updated on

Holi 2024 :  एरंडाचे झाड आजवर आपण केवळ रस्त्यावर, उकीरड्यावर पाहत आलो आहोत. एरंडाच्या झाडाचा काही उपयोग नाही असे वाटल्याने त्याचे संवर्धन केले जात नाही. मग अशा या झाडाला होळीत जाळण्याचा मान कसा मिळाला हा प्रश्न पडतो.  

अनेक वर्षांपासून एरंडाचे झाड होळीत मध्यभागी उभे केले जाते. त्याच्याभोवती शेणी रचून ती पेटवली जाते. धार्मिकदृष्ट्या या विधीला महत्व आहे. भक्त प्रल्हाद यांना मारण्यासाठी पिता हिरण्यकश्यपूने होलिका राक्षसीला अवाहन केले होते.

ती प्रल्हादांना मांडीवर घेऊन बसली अन् शिपायांनी होळी पेटवली. ती आग भक्त प्रल्हादांच्या केसालाही धक्का लावू शकली नाही. पण होलिका म्हणजे वाईट हेतू बाळगणारी ती राक्षसी मात्र जळून खाक झाली.

Holi 2024
Holi 2024: रंगोत्सवात नको प्राण्यांना इजा,अशी घ्या काळजी

आज आपण एरंडाच्या झाडाचे काही फायदे पाहणार आहोत. एरंडेल तेलाचे झाड एक बारमाही फुलांची वनस्पती आहे, जी लहान आकारापासून सुमारे 12 मीटर उंचीपर्यंत वेगाने वाढू शकते. परंतु ती नाजूक असते. तिची पाने १५-४५ सेमी लांब असतात.

एरंडाचे झाड रोग नाशक मानले जाते. म्हणजेच आजा वातावरणात पसरणाऱ्या किटक, दुषिक कण यांच्यावर आपण औषध फवारणी करतो. अशी फवारणी करण्याची सुविधा पूर्वी नव्हती. त्यामुळे साथीचे आजार बळावर होते. तर हे झाड जाळल्याने दुषित हवा स्वच्छ होते,अशीही मान्यता आहे.

एरंडीच्या बिया

एरंडेल बिया हे एरंडेल तेलाचे स्त्रोत आहेत. बियांमध्ये 40-60% तेल असते, जे ट्रायग्लिसराइड्स, विशेषत: रिसिनोलिनने समृद्ध असते. या बियामध्ये रिसिन नावाचा विषारी पदार्थ देखील असतो, जो झाडाच्या जवळपास सर्व भागांमध्ये असतो.

एरंडेल तेल स्वच्छ हलक्या रंगाचे आणि गंधहीन असते. हे शुद्ध अल्कलॉइड्ससाठी उत्कृष्ट विद्रावक म्हणून नेत्ररोग शस्त्रक्रियेमध्ये वापरले जाते. याशिवाय याचे औषधी उपयोगही आहेत. हे तेल औषधात एक मौल्यवान रेचक मानले जाते.

Holi 2024
Holi 2024 : रंगात न्हाऊनी केली तयारी, पुरणाच्या पोळीची आली होळी! इथे आहेत होळीच्या रंगेबेरंगी शुभेच्छा

डोळे साफ करते

डोळ्यात धूळ, माती गेल्याने आपण डोळ्यांना चोळतो.  तेव्ह डोळ्यातली घाण बाहेर पडत नाही. पण, हाताने चोळल्याने इन्फेक्शन होऊ शकतं. यावेळी एरंडीच्या बियांपासून बनवलेले तेल डोळ्यात सोडा. याने डोळ्यातून पाणी येईल त्यावाटे डोळ्यातली घाण निघून जाईल.

Holi 2024
Holi 2024 : फक्त रंगात नाही तर दारूमध्ये खेळली जायची रंगपंचमी.. जाणून घ्या मुघलांच्या होळीचा इतिहास

स्तनांमधील सूज

नवजात बालकांच्या मातांना हा त्रास होतो. पुरेसे दूध स्तनांमधून बाहेर न आल्याने महिलांचे स्तनांमध्ये सूज चढते. स्तनांमध्ये असलेली सूज कमी करण्यासाठीही एरंडीच्या झाडाचा उपयोग होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.