Holi 2024 : कितीही घासला तरी अंगावरचा केमिकलयुक्त रंग काही उतरेना, हे प्रयोग करून पहा, फरक पडेल

रंग खेळायला जाण्याआधी या गोष्टी नक्की करा
Holi 2024
Holi 2024esakal
Updated on

Holi 2024 :

आजकालच्या तरूण दिवाळीपेक्षाही अधिक वाट होळीची पाहत असतात. कारण, होळीनंतर रंगपंचमी खेळली जाते. तरूणांसाठी हा मनसोक्त रंग खेळून पाण्यात भिजण्याचा दिवस आहे. पण या सणाची जास्त भितीही त्यांनाच वाटते. कारण, आजकाल होळीचे रंग खेळताना केमिकलच्या रंगाचा वापर केला जातो.

हे केमिकलचे रंग काही केल्या चेहऱ्यावरून जात नाहीत. आणि जरी गेले तरी त्वचेवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्वचा कोरडी होते, पुरूळ उठतात असे अनेत त्वचा विकार होऊ शकतात. असे केमिकलचे रंग ब्रश, अंग घासण्याच्या काथ्यानेही जात नाहीत.

Holi 2024
Nandurbar Holi Festival : सातपुड्यात होलिकोत्सवाला प्रारंभ

त्यामुळे केमिकलयुक्त रंग घालवणे अवघड होऊन बसते. तेव्हा केमिकलचे रंग चेहऱ्यावरून घालवण्यासाठी काय करायचे हे पाहुयात.

- बेसन लिंबू आणि दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा. थोडावेळ तसेच राहूद्यात. मग ते धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील केमिकल दूर होईल.

- चेहऱ्यावरील सर्व डाग निघून जावेत असे वाटत असेल. तर, काकडीचा रस काढून घ्या. त्यामध्ये गुलाब जल घालावे याची पेस्ट बनवून घ्यावी. या पेस्टने चेहऱ्यावर मसाज करावा थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवावा.

Holi 2024
Holi 2024 : घाणीत,कचऱ्याच्या बाजूला उगवणाऱ्या एरंडाच्या झाडालाच होळीत जाळण्याचा मान का?

- चेहऱ्यावरील रंगाचे डाग जाण्यासाठी दूध बेसन आणि मैदा एकत्र करून फेसपॅक करावा. तो चेहऱ्याला लावून ठेवावा आणि थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवावा.

- ज्वारीचे पीठ आणि बदामाचे तेल एकत्र करून चेहरा आणि शरीरावर लावावे. ज्यामुळे चेहऱ्यावरील केमिकल निघून जाते.

- दूधामध्ये कच्चा पपई खिसून घाला. त्यात मुलतानी माती आणि बदामाचे तेल घाला. हे तयार मिश्रण चेहऱ्याला लावा. आणि २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

Holi 2024
Holi 2024 : आजच्या रात्री स्वप्नात दिसली ही वस्तू, तर समजून जा नशिब होणार धन-धना-धन

- संत्र्याची साल आणि मसूराची डाळ बदाम आणि दूधात वाटून पेस्ट बनवा. ते तयार उटणे संपूर्ण त्वचेवर लावा आणि सुकल्यानंतर स्वच्छ धुवा.

रंग खेळायला जाण्याआधी या गोष्टी नक्की करा

  • आइस क्यूबने चेहऱ्यावर मसाज करा. ज्यामुळे स्कीन पोर्स बंद होतील आणि केमिकल त्वचेमध्ये जाणार नाही.

  • केमिकल रंगांपासून वाचण्यासाठी चेहरा, मान,गळ्याला सनस्क्रीम लावावी.

  • चेहऱ्याला खोबरेल तेल,बदामाच्या तेलाने मसाल कारावा. चेहऱ्यावर तेलाची लेअर असेल तर रंग थेट त्वचेच्या संपर्कात येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.