यंदाच्या वर्षी २४ मार्च रोजी होळी आहे. होळीला पुरणाची पोळीचा नैवेद्य केला जातो. गल्लीत अन् दारात होळी पेटवली जाते. मनातील वाईट विचार या होळीत जाळून टाकले जातात, अशी मान्यता आहे. होळीसाठी लहान मुलं टिमकी वाजवतात. होळीच्या भोवती बोंब मारत फिरतात. होळीची एक वेगळीच संस्कृती आहे. अशी ही होळी तुमच्या अनेक अडचणीही दूर करू शकते.
एखाद्या घरी सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक वाईट घटना घडायला लागतात. घरात येणारी लक्ष्मी थांबते. लोक पैसे बुडवतात अन् हातात पैसा नसताना दवाखाना मागे लागतो. एखादी मोठी घटना घडते. आता कर्जाचा डोंगर कसा सावरावा या पेचात माणूस अडकलेला असतो. (Holi 2024)
तुम्हीही अशाच संकटांचा सामना करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. कारण यंदाची होळी तुमच्या या अडचणी दूर करणारी लाभदायी ठरू शकते. या होळीला काही गोष्टी अर्पण केल्याने तुमच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत.
पहिली गोष्ट – खाऊची पाने
तुम्हा सर्वांना माहिती आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे. प्रत्येक पूजेला खाऊची पाने लागतात. होळी दिवशी हीच खाऊची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील. होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तूपात भिजवून अर्पण करा. याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता भासत नाही. हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा.
दुसरी वस्तू - नारळ
नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही. पण असं म्हणतात की, एखादे काम पूर्णत्वास जावे म्हणून पूर्वी पशु,प्राण्याचा बळी देण्याची प्रथा होती. त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो. होळी समोर हा नारळ फोडून त्यामध्ये गूळ आणि अळशीचे बी भरावेत. आणि तो आगीत टाकावा. (Holi Astrology Tips)
कापूर आणि कडुलिंबाची पाने
उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाने टाकणे शुभ असते. यासाठी 10 कडुलिंबाची पाने, लवंग आणि कापूरचा तुकडा एकत्र करून आगीत टाका. आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरून घ्या.
गहू आणि ज्वारी
होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही. होळीच्या आगीत गहू भाजून खातात.
चंदन
जीवनात सुख-शांतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी होळी दहनात चंदनाच्या लाकडेही घालावीत. असे केल्याने तुम्ही जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता. तुमच्या प्रगतीला कोणीह थांबवू शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.