Holi 2024 : केमिकलयुक्त रंगांनी नको तर अशी खेळा इको-फ्रेंडली होळी, होळीचा आनंद होईल द्विगुणीत

त्वचेवर आणि केसांवर तेल आणि कोरफडीचे जेल लावू शकता
Holi 2024
Holi 2024 esakal
Updated on

Holi 2024 :

लहान मुलांसह सगळेच होळीची वाट आतुरतेने पाहतात. होळीदिवशी कुटुंबियांकडून पाण्यात भिजण्याची आयती परवानगीच मिळते. होळीदिवशी ऑफिस, गल्लीतली तरूण मुलं, लहान मुलं जमेल त्या पद्धतीने होळी खेळत असतात. सध्या रंग लावण्याच्या दिवशी, बाईक रॅली काढणं, डिजेच्या तालावर ठेका धरणं असे प्रकार होऊ लागले आहेत.

होळी दिवशी केला जाणारा भयंकर प्रकार म्हणजे होळीला वापरले जाणारे रंग जे केमिकलचे असतात. आणि ते मुद्दाम वापरले जातात. त्यामुळे त्वचेचे आजार होतात अन् ते रंग निघतच नाहीत.

Holi 2024
Holi 2023 : ‘बेरंग’ बरसे... भरकटलेल्या ‘युवा’शक्तीचे बीभत्स वर्तन!

तरूण वर्गामध्ये हे रंगांचे फॅड आहे. साध्या केमिकल नसलेल्या रंगांनी होळी खेळून सण साजरा करण्याचे अवाहन सोशल मिडियावर केले जाते. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. कोरड्या रंगांची होळी खेळत नाहीत. त्यामुळे पाण्याचेही नुकसान होते. यासाठीच आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत ज्या होळी खेळताना पाळल्या तर तुमच्या त्वचेचे नुकसान होणार नाही. आणि ज्यामुळे होळीच्या आनंदावर विरझनही पडत नाही.

नैसर्गिक रंग वापरा

तुम्ही नैसर्गिक रंग वापरण्याचा हट्ट मित्र,मैत्रिणींकडे करू शकता. बाजारात असलेले केमिकलचे रंग तुमच्यासह मित्रांच्या त्वचेसाठी चांगले नसतात. त्यामुळे तुम्ही नैसर्गिक रंगांनीच होळी खेळा. बाजारातही नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत. पण तुम्ही घरीही हे रंग बनवू शकता. यासाठी बिट, हळद, सुकलेली फुले यांपासून रंग बनवता येतात. (Holi Celebratrion 2024)

Holi 2024
Holi 2023 : ‘बेरंग’ बरसे... भरकटलेल्या ‘युवा’शक्तीचे बीभत्स वर्तन!

फुग्यांचा वापर करू नका

होळी, रंगपंचमीला एकमेकांना फुगे फेकून मारले जातात. हे फुगे लांबून मारले तर एखाद्याला इजाही होऊ शकते. तसेच, ज्यामुळे पाण्याचाही अति वापर केला जातो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी फुग्यांचा वापर करू नका.

Holi 2024
Nandurbar Holi Festival : सातपुड्यातील होळीसाठी ढोल अन नृत्यांचा सराव!

मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका

होळीदिवशी अनेक तरूण मुलं भांग पिऊन दंगा करतात. इतरांना त्रास देतात. त्यात ते मुक्य जनावरांनाही त्रास देतात. जनावरांच्या अंगावर रंग फेकणे, त्यांच्या अंगावर केमिकलच्या रंगांची डिझाईल करणे, रंगांचे पाणी जनावरांवर टाकणे असे प्रकार करतात. पण ते असा विचार करत नाहीत की, अशा या वागण्यामुळे जनावरांना त्रास होऊ शकतो. त्यांना इजाही होऊ शकते. केमिकल डोळ्यात गेल्याने ते दृष्टीहीन होऊ शकतात.

Holi 2024
Holi News: होळीसाठी एसटीची जय्यत तयारी; १२६ विशेष जादा गाड्यांचे नियोजन

केस आणि त्वचेची काळजी

केमिकलच्या रंगांनी आपल्या केसांना आणि त्वचेला त्रास होऊ शकतो. हे तर तुम्हाला माहितीय. त्यामुळेच इतरांना रंग लावताना आणि रंग लावून घेताना तो जास्त लावू नका अन् लावून घेऊही नका. कारण, या केमिलचा केस अन् त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते. त्याचा परिणाम अनेक दिवस त्वचेवर दिसून येतो.

त्यामुळेच त्वचेवर आणि केसांवर तेल आणि कोरफडीचे जेल लावू शकता. ज्यामुळे त्वचेवर काही परिणाम होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.