Holi 2024
Holi 2024esakal

Holi 2024 : यंदा होळी दणक्यात साजरी करायचीय? मग, भारतातील 'या' शहरांमध्ये जायलाच लागतंय

Holi 2024 : अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या सणांपैकी हा एक सण आहे.
Published on

Holi 2024 : अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या सणांपैकी हा एक सण आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. काही ठिकाणी होळी साजरी करण्याच्या विविध परंपरा आहेत.

हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे होळी होय. दरवर्षी होळी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा होळी २४ आणि २५ मार्चला साजरी केली जाणार आहे. २४ मार्चला होलिका दहन केल्यानंतर २५ मार्चला धूलिवंदन साजरे केले जाणार आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, येथील होळी देखील तितकीच वेगळी आणि अनोखी असते.

यंदाच्या होळीला जर तुम्हाला भारतातील विविध शहरांमध्ये साजरी होणारी होळी अनुभवायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. तुम्हाला त्या ठिकाणची होळी देखील पहायला मिळेल, त्यात सहभागी होता येईल आणि तेथील परिसर पाहता देखील येईल. चला तर मग जाणून घेऊयात भारतातील या शहरांबद्दल जिथे होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Holi 2024
Holi 2024 : मथुरा-वृंदावनमध्ये साजऱ्या होणाऱ्या रंगोत्सवात सहभागी व्हायचंय? मग, फिरायला जाण्याचा करा प्लॅन

उदयपूर

राजस्थानातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि तलावांचे शहर म्हणून उदयपूर या शहराची खास ओळख आहे. या शहरात तुम्हाला विविध पर्यटनस्थळांना भेट देता येईल यासोबतच येथील होळीच्या उत्सवात सहभागी होता येईल.

होळीच्या दिवशी संपूर्ण उदयपूर हे रंगांमध्ये न्हाऊन जाते. येथील रस्ते, परिसर हा रंगांनी माखलेला असतो. जर तुम्हाला यंदाची होळी अविस्मरणीय बनवायची असेल तर तुम्ही उदयपूरला जाऊ शकता.

बरसाना

उत्तर प्रदेशातील बरसाना हे शहर राधाराणीचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मथुरा जिल्ह्यात स्थित असलेले हे शहर होळीसाठी देखील प्रसिद्ध आहे. याच शहरात प्रसिद्ध अशी लाठमार होळी खेळली जाते.

होळीच्या दिवशी या शहरातील स्त्रिया पुरूषांना लाठी किंवा काठीने मारतात आणि रंग खेळतात, अशी येथील अनोखी परंपरा आहे. लाठमार होळीसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. होळीच्या रंगोत्सवात सहभागी होण्यासाठी तुम्ही या शहरात फिरायला जाऊ शकता.

Holi 2024
Holi 2024 : यंदा अनोख्या पद्धतीने साजरी होणारी होळी अनुभवायचीय? मग, दक्षिण भारतातील ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()