Home Decor: घरातील पडद्यांची 'अशी' करा निवड , सर्वच करतील कौतुक

Home Decor: सर्वात आधी घरानुसारा पडद्याचे पॅटर्न निवडावे
Home Decor:
Home Decor:Sakal
Updated on

Home Decor: घरात पडदे लावल्यास केवळ सूर्याच्या किरणांपासूनच नाही तर ते तुमच्या घराच्या सजावटीतही महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी पडद्यांचा रंग आणि डिझाइन आणि त्यांना लटकवण्याची पद्धत देखील घराला एक अनोखा लुक देण्यास मदत करते. तुम्हालाही तुमच्या घरात वेगळ्या पद्धतीने पडदे लावायचे असतील पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

योग्य पॅटर्न

सर्वात आधी घरानुसारा पडद्याचे पॅटर्न निवडावे. तुमचे घर कसे डिझाइन केले त्यानुसार पडदे खरेदी करावे. तुमचे घर आधुनिक, पारंपारिक की आणखी काही? एकदा तुम्हाला तुमच्या घराचा पॅटर्न कळला की, त्यासाठी पडदे निवडणे सोपे होऊ शकते.

 योग्य रंगसंगती

पडद्यांचा रंग निवडताना तुमच्या घराच्या रंग लक्षात ठेवावा. तुमच्या घरातील भिंतीच्या रंगांशी जुळणारे पडदे निवडावे किंवा तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगाचे पडदे देखील वापरू शकता.

 पडद्यांचा आकार

घरातील दरवाजे, खिडक्यांच्या आकारानुसार पडद्यांचा आकार ठरववा. तसेच, लहान खोल्यांसाठी नेहमी हलके रंग आणि लहान  असलेले पडदे खरेदी करावे. मोठ्या रूमसाठी, गडद रंग आणि मोठ्या पॅटर्नचे पडदे खरेदी करावे.

Home Decor:
Home Decor Idea: तुमच्या वॉशरूमला मिळेल हटके लुक, वापरा 'या' खास टिप्स

प्रकाशानुसार पडदे निवडावे

पडदे निवडताना तुम्हाला तुमच्या खोलीत किती प्रकाश हवा आहे याचा विचार करावा. जर तुम्हाला जास्त प्रकाश हवा असेल तर हलके रंग आणि फॅब्रिक्स असलेले पडदे वापरावे.

मुख्य प्रवेशद्वारावर कोणते पडदे लावावे

मुख्य प्रवेशद्वारासाठी तुम्ही एक पडदा निवडू शकता ज्यावर प्रिंट्स किंवा फ्लोरल प्रिंट्स असतील. याशिवाय मुख्य प्रवेशद्वारावर घराच्या थीमचे किंवा कॉन्ट्रास्ट कलरचे पडदेही लावता येतात. मुख्यप्रवेशद्वारावर लावण्यासाठी तुम्ही स्टँडच्या दोन्ही बाजूला पडदा लावू शकता. यामुळे घराला आकर्षक लूक मिळेल.

बेडरूमसाठी कसे असावे पडदे?

बेडरूममध्ये शांतता देणारे पडदे लावावे. जर तुम्हाला शांत आणि आरामदायक वातावरण हवे असेल तर हलके रंग आणि मऊ कापड असलेले पडदे लावावे. जर तुम्हाला अधिक औपचारिक वातावरण हवे असेल, तर तुम्ही गडद रंग आणि जड कपड्यांचे पडदे निवडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.