Home Remedies : खोकून-खोकून जीव मेटाकुटीला आलाय? औषध नाहीतर हे घरगुती उपाय जास्त मदत करतील

खोकला पळवायला दूधही गुणकारी ठरेल
Home Remedies
Home Remediesesakal
Updated on

Home Remedies

वातावरणात झालेला बदल थेट तुमच्या आरोग्यार परिणाम करतो. आता थंडीची चाहुल लागतेय त्यामुळे हवेत आद्रता आहे. या हवेमुळे तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होतो. कोरडा खोकला एकदा लागला की जाण्याचं नावं घेत नाही. औषधांनी सर्दी बरी होते पण खोकला काही जात नाही.

खोकल्यावर आपल्या पूर्वापार चालत आलेल्या काही काढ्यांचा परिणाम अधिक होतो. आजही जेव्हा खेड्यात कोणाचा ठकसा, खोकला कमी येत नसेल तेव्हा गावातील जाणकार आजीकडून काढा घेतल्यास आराम मिळतो.

Home Remedies
Indian Borage सर्दी-खोकला, त्वचेच्या समस्यांपासून मुक्तता हवीय? जाणून घ्या या आयुर्वेदिक रोपाचे आरोग्यदायी महत्त्व

खोकल्यावर अनेक घरगुती उपाय आहेत. जे तुम्हाला कोरड्या खोकल्यापासून आराम देऊ शकतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अंगणात असलेली तुळस. खोकल्यासाठी तुळशीची काही पाने घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. नंतर ही पाने एक कप पाण्यात उकळा. साधारण अर्धा ग्लास होईपर्यंत ते पाणी आटवून घ्या. नंतर ते गाळून प्या. तुळशीचा चहा खोकल्यामध्ये खूप फायदेशीर आहे.

हळद आणि दूध

अनेक दिवस खोकला बरा होत नसेल तर एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून उकळा. नंतर झोपण्यापूर्वी या दूधाचे सेवन करा. या घरगुती उपायाने तुम्हाला खोकल्यापासून लवकर आराम मिळेल.

Home Remedies
नागरिकांना खोकला, श्‍वसनाचा त्रास जलतरण तलावात गॅस गळती ः उग्र वासामुळे हरितद्रव्याचाही नाश

ज्येष्ठमध

जर तुमचा खोकला बराच काळ बरा होत नसेल तर एक चमचा ज्येष्ठमध बारीक करून घ्या. नंतर एक कप पाण्यात उकळा. पाणी निम्मे झाले की थंड होऊ द्या आणि नंतर गाळून घ्या. हे दिवसातून दोनदा प्या.

मध आणि आले

खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी ताजे आले घेऊन ते चांगले ठेचून घ्यावे. नंतर एक चमचा मधात आल्याचा रस मिसळा. हे मिश्रण रोज सकाळी आणि संध्याकाळी प्या. २ ते ३ दिवसात खोकल्यापासून आराम मिळेल.

Home Remedies
रात्री बरोबर झोपताना खोकला येतो, मग 'हे' उपाय करा ट्राय
हा तर पुर्वापार चालत आलेला उपाय आहे
हा तर पुर्वापार चालत आलेला उपाय आहेesakal

गरम पाणी आणि मीठ

खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून एका ग्लास कोमट पाण्यात मीठ मिसळा. नंतर हे पाणी कोमट झाल्यावर दिवसातून दोनदा गुळण्या करा. यामुळे घसा खवखवणे आणि खोकला देखील काही दिवसात बरा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.