Black Hair Tips: खोबरेल तेलात टाकून लावा या 2 गोष्टी, पांढरे केस काही दिवसातच होतील काळे!

केस काळे करण्यासाठी लोक वेगवेगळे घरगुती उपाय देखील करतात.
hair
hairsakal
Updated on

आजकाल लोकांचे केस अगदी लहान वयातच पांढरे होत आहेत. ज्येष्ठांबरोबरच तरुणांनाही याचा सामना करावा लागत आहे. केस पांढरे झाल्यामुळे अनेक वेळा शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये मित्रांसमोर लाज वाटते.

पांढरे केस काळे करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यासाठी बाजारातून रसायनयुक्त उत्पादनेही वापरली जातात, जी हानिकारक ठरू शकतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही पांढरे केस काळे करू शकता. चला, आज आम्ही तुम्हाला केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत.

1. खोबरेल तेल आणि आवळा: खोबरेल तेलमध्ये आवळा मिसळून लावल्याने केस काळे होण्यास मदत होते. यासाठी 3 चमचे खोबरेल तेल घ्या आणि त्यात 2 चमचे आवळा पावडर मिसळा. आता एका भांड्यात तेल आणि पावडर नीट विरघळेपर्यंत गरम करा. यानंतर तेल थंड करून केसांच्या मुळांवर चांगले मसाज करा.

hair
Ceiling fan cleaning tips: 5 मिनिटात स्मार्ट पद्धतीनं पंखा स्वच्छ करा, या ट्रिक्स वापरून पाहा

रात्रभर असेच राहू द्या आणि सकाळी शॅम्पू करा. विशेष म्हणजे आवळ्यामध्ये कोलेजन वाढवण्याची क्षमता असते कारण त्यात व्हिटॅमिन सी आढळते. काळे केस वाढण्यास हे खूप उपयुक्त आहे.

2. नारळाच्या तेलात मेंदीची पाने मिसळा: जर तुम्हालाही पांढरे केस दूर करायचे असतील तर नारळाचे तेल आणि मेंदी तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. जेव्हा मेंदीचा तपकिरी रंग केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतो तेव्हा केस पूर्वीसारखेच दिसू लागतात.

hair
Sabudana Health Benefits : साबुदाणा खाणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत

यासाठी 3-4 चमचे खोबरेल तेल उकळून त्यात मेंदीचे पान टाका. तेल तपकिरी होईपर्यंत उकळवा. यानंतर तेलाचा रंग हलका तपकिरी झाला की ते थंड करून केसांच्या मुळांना लावा. यानंतर, 40-50 मिनिटे असेच राहू द्या. यानंतर केस धुवावेत. या प्रक्रियेचा अवलंब केल्यास तुमचे केस हळूहळू काळे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.