Men Health : हे साधे-सोपे उपाय वाढवतात पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या

चांगल्या शुक्राणूंच्या निर्मितीसाठी चांगली ७-८ तासांची झोप आवश्यक आहे. त्यामुळे चांगली झोप घ्या.
Men Health
Men Healthsakal
Updated on

मुंबई : आज तरूण पुरुषांमध्ये प्रजनन समस्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. शुक्राणूंची कमी संख्या, शुक्राणूंची कमी गतिशीलता आणि असामान्यपणे दिसणारे शुक्राणू ही पुरुष वंध्यत्वाची काही सामान्य कारणे आहेत. (home remedies to increase sperm count )

पालकत्व प्राप्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांत पुनरुत्पादन समस्यांना तोंड देत असलेले पुरुष जीवनशैलीतील अशा बदलांच्या शोधात असतात ज्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता वाढू शकते आणि त्यांना त्यांचे पालकत्वाचे स्वप्न साकार करण्यात मदत होते.

पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या वाढवण्याचे उपाय सांगत आहेत डॉ. तेजस गुंडेवार, एम. एच. प्रजनन औषध आणि शस्त्रक्रिया (गोल्ड मेडलिस्ट) एमआरसीओजी (लंडन), पुरुष वंध्यत्वाचे विशेष प्रशिक्षण (यूएसए), मुख्य पुरुष-महिला प्रजनन सल्लागार, रुबी हॉल क्लिनिक, पुणे. हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Men Health
Smoking Habit: धूम्रपान काही केल्या सोडवत नाहीये ? हे उपाय करून पाहा...

जीवनशैलीतील बदल

चांगली झोप : चांगल्या शुक्राणूंच्या निर्मितीसाठी चांगली ७-८ तासांची झोप आवश्यक आहे. त्यामुळे चांगली झोप घ्या.

धूम्रपान, अल्कोहोल, तंबाखू सोडा - अति धूम्रपान, तंबाखू किंवा मद्यपान शुक्राणूंच्या आरोग्यासाठी चांगले नाही. या सर्व गोष्टी आरोग्याला हानी पोहोचवतात.

चरबी कमी करा

पुरुषांमधील लठ्ठपणामुळे टेस्टोस्टेरॉनमध्ये घट होते, ज्यामुळे सेक्स ड्राइव्ह आणि शुक्राणूंची संख्या कमी होते. 'कमी खाणे आणि जास्त व्यायाम' ही संकल्पना वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे. यामुळे शुक्राणूंची संख्या वाढू शकते आणि परिणामी प्रजनन क्षमता सुधारू शकते.

तणाव कमी करणे

अभ्यासातून असे दिसून आले आहे की तणावपूर्ण जीवन असलेल्या पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा धोका १०-१५% वाढतो. वाढलेल्या तणावामुळे कॉर्टिसॉल हार्मोनचे उत्पादन वाढते ज्याचा शुक्राणूंच्या आरोग्यावर हानिकारक प्रभाव पडतो.

तणावाचा लैंगिक जीवनावरही परिणाम होतो ज्यामुळे जोडप्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. समस्येबद्दल बोलणे, ऑनलाइन गटांमध्ये सामील होणे, संगीत, व्यायाम, योग, ध्यान, खेळ खेळणे, पाळीव प्राणी असणे हे काही तणाव कमी करण्याचे मार्ग आहेत.

व्यायाम करा

व्यायामामुळे जळजळ कमी होते, अँटी-ऑक्सिडंट्स वाढतात, अवयवांना रक्तपुरवठा वाढतो, टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढते ज्यामुळे शुक्राणूंची संख्या सुधारते.

स्क्वॅट्स, पुशअप्स, डेडलिफ्ट्स, बेंच प्रेस, पुलअप्स/चिनअप्स, ओव्हरहेड प्रेस हे व्यायाम स्नायूंच्या वस्तुमानात वाढ करतात आणि व्यायामादरम्यान स्नायूंच्या वस्तुमानात होणारी वाढ ही टेस्टोस्टेरॉन सोडण्यात एक महत्त्वाचा घटक मानला जातो.

Men Health
Night Fall : स्वप्नात दिसतात लैंगिक दृश्ये; स्वप्नदोषाला कसे सामोरे जाल ?

योग देखील करा

मूल बंध उर्फ ​​रूट लॉक - शरीराच्या खालच्या भागात रक्तपुरवठा सुधारण्यासाठी आणि शुक्राणूंची संख्या सुधारण्यासाठी ही योग मुद्रा उपयुक्त आहे.

बदाम, अक्रोड : अक्रोडमध्ये ओमेगा ३ आणि ६ फॅटी अॅसिड असतात जे शुक्राणूंची गती सुधारण्यासाठी ओळखले जातात.

लसूण सेलेनियममध्ये समृद्ध आहे जे गुणसूत्रांचे तुटणे कमी करेल आणि शुक्राणूंचे आरोग्य सुधारेल. टोमॅटो आणि डाळिंब शुक्राणूंचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

लिंबू, द्राक्ष आणि संत्रे यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये पुट्रेसिन आणि व्हिटॅमिन-सी असते ज्यामुळे शुक्राणूंचा वेग वाढतो आणि त्यामुळे प्रजनन क्षमता वाढते.

निरोगी संबंध

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जोडप्याची प्रजनन क्षमता निरोगी नातेसंबंधावर अवलंबून असते. जोडीदारासोबत वेळ घालवणे, त्यांच्या गरजा समजून घेणे आणि स्क्रीन मर्यादित करणे चांगले संबंध निर्माण करण्यात आणि प्रजनन क्षमता अनुकूल करण्यात मदत करेल.

याव्यतिरिक्त, टेस्टोस्टेरॉन, स्टिरॉइड शॉर्ट्स, ज्याचा बॉडीबिल्डिंगसाठी युवकांद्वारे सामान्यतः वापर केला जातो, त्याचा शुक्राणूंच्या संख्येवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे पालकत्वाची योजना करणाऱ्या पुरुषांनी ते टाळणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.