Home remedy : उन्हाळ्यात घामानं पुर्ण शरीर डबडबलेलं असतं. एकदम कडक उन्हाळा असल्याने एसीमध्ये बसूनही घाम येतोच. त्यामुळे उन्हाळ्यात शूज घालणाऱ्यांचे वाईट हाल होतात. शाळेत जाणाऱ्या मुलांना तर दररोज शाळेचे बूट घालण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांच्या बाबतीत तर ही समस्या जास्त जाणवते.
तुमचे पाय खूप वेळा ओले असतात, ज्यामुळे शूज आणि सॉक्समध्ये ओलावा कायम राहतो. अशा स्थितीत घाम आणि बॅक्टेरियामुळे तुमच्या शूजमध्ये दुर्गंधी येते. तुमच्या शूजांना वाईट वास येण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशा काही टिप्स येथे आहेत.
घरातच चपला- बूटाचे स्टॅंड असते,त्यामूळे घरातही कुबट घाणेरडा वास येऊ लागतो. त्यामूळेच यासाठी काय उपाय करता येतील हे पाहुयात.
सॉक्सची निवड
तुम्ही कोणते सॉक्स घालता यावरही तुमच्या बुटांची दुर्गंधी अवलंबून असते. जाडसर सॉक्स घालत असाल तर तळपायांना जास्त घाम येतो आणि दुर्गंधी वाढते. त्यामुळे sweat-wicking सॉक्स घालण्यास प्राधान्य द्या. यामुळे घाम कमी येतो.
कॉपरचा बेस किंवा रबराचा बेस असणारे सॉक्सही बाजारात मिळतात. हे सॉक्स घातल्यानेही घाम कमी येतो. कॉटन किंवा होजियरीचे सॉक्स घालत असाल तर ते दर २ दिवसांनंतर धुतलेच पाहिजेत याची काळजी घ्या.
इनसोलची निवड
आपण धुण्यायोग्य इनसोल वापरून पाहू शकता. हे कॉटन टेरी कापडाचे बनलेले असतात आणि त्यात रबर लेटेक्स सोल असतात. त्यांना ताजे ठेवण्यासाठी, त्यांना तीन ते सहा वेळा परिधान केल्यानंतर धुवा.
शुज थंड जागी ठेवा
शूज थंड जागी ठेवा ज्या लोकांच्या चपलांना दुर्गंधी येते त्यांनी आपले शूज थंड आणि सावलीच्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळे बॅक्टेरियांना वाढण्याची संधी मिळत नाही आणि चपला दुर्गंधी येण्यापासून वाचतात.
शूज धुणे
जर शक्य असेल आणि २- ३ दिवस बूट घातला नाही तरी चालणार असेल, तर हा उपाय करता येईल. ओलसर बुटांमधून जास्त दुर्गंध येतो. त्यामुळे ओलसर बूट एकदा साबण किंवा वॉशिंग पावडर लावून चांगले धुवून घ्या. उन्हामध्ये २ ते ३ दिवस ते चांगले वाळू द्या. यामुळे बुटांमधली दुर्गंधी चटकन कमी होते.
टाल्कम पावडरचा वापर
बुटांमध्ये तुम्ही तुमचं नेहमीचं टाल्कम पावडर थोडं टाकून ठेवा. यामुळे बुटांमधला ओलसरपणा आणि दुर्गंध दोन्हीही शोषून घेतल्या जाईल तसेच पावडरचा सुवास बुटांना लागेल. आजकाल मेडिकेटेड फूट पावडर देखील मिळतात. या पावडर बुटांमध्ये टाकून ठेवल्याने त्यांच्यात फंगसची होणारी वाढ रोखली जाते आणि त्यामुळे आपोआपच घाण वास येणं कमी होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.