Milk Boiling Tricks : आपल्याला वाटते दूध उकळवायला कशाला हव्यात ट्रिक्स, दूध उकळणे जेवढे सोपे वाटते तसे नाही. असे तुमच्या बाबतही झाले असेल की, दूध गरम करायला ठेवले आणि विसरले. मग नंतर दूध ऊतू जाते आणि दूध जळल्याचा वास येतो. तर दूध वर आल्यावर ऊतू जाण्याआधिच बंद झाले तरी ते भांड्याला चिकटते. अशावेळी भांड स्वच्छ करताना नाकी नऊ येतात. यावरच उपाय म्हणून जाणून घ्या सोप्या ट्रिक्स.
कसे उकळवावे दूध
ज्या भांड्यात दूध गरम करायचे आहे ते आधी पाण्याने धुवून ओले करावे. पाण्याच्या लेयरमुळे दूध खाली चिकटणार नाही.
दूध गरम करताना त्यात लहान चमचा किंवा स्पॅच्युला टाकावा म्हणजे ऊतू जाणार नाही.
दूध उकळताना त्याच्या काठाला आलेली मलई अलगत बाजूला करावी.
दूध उकळताना अर्धा चमचा सोडियम बायकार्बोनेट मिक्स करा. यामुळे दूध ऊतू जाणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.