सध्या व्हायरल आजार हे अशुद्ध पाण्यामुळे होत आहेत. नाल्यातील घाण पाणी नदीत मिसळते आणि ते पाणी स्वच्छ करून आपल्याला दिलं जातं. पण ते पाणी खरंच पिण्यायोग्य स्वच्छ आहे का हे कळत नाही. त्यामुळेच योग्य ती काळजी न घेतल्याने आपल्याला पाण्यापासून अनेक आजार होऊ शकतात.
खरंतर निरोगी राहण्याचा एक मूलमंत्र म्हणजे मूलभूत प्रमाणात स्वच्छ पाणी पिलं पाहिजे. योग्य प्रमाणात आपल्या शरीराला शुद्ध पाणी मिळाल्यास आपले शरीर निरोगी राहते. शरीराला पाणी कमी पडले तर आपल्याला पचनाचे आजारी होऊ शकतात. (Water)
त्यामुळेच भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आपल्याला जशी अन्नाची गरज आहे तशी स्वच्छ पाण्याची सुद्धा गरज आहे. पण सध्या सर्वत्र RO चे पाणी पिले जाते. RO सारखे महागडे मशीन सर्वांनाच परवडणारे असतील असे नाही.
हलक्या दर्जाचा प्युरिफायर घेऊन आपल्याला पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी मिळत नाही. अशावेळी तुम्ही प्राचीन काळातील पाणी स्वच्छ करण्याचे काही उपाय करू शकता. त्यामुळे तुम्हाला कमी खर्चात स्वच्छ आणि पोषण युक्त पाणी पिण्यास मिळेल.
पूर्वीच्या काळात RO, फिल्टर अशा वस्तू नव्हत्या. तेव्हा लोक मातीच्या मडके आणि हंड्यांमध्ये पाणी साठवायचे. मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचा आणि फायदा सुद्धा आहेत. आपल्या शरीराला कॅल्शियमची कमतरता भासत नाही. तर उलट मातीच्या भांड्यात पाणी थंडगारही राहते.
मातीच्या भांड्यात पाणी साठवण्याची एक वेगळी पद्धत आहे. जर तुम्हाला मातीच्या भांड्यातील पाणी शुद्ध हवे असेल तर मातीच्या भांड्यात कोळशाचे काही तुकडे टाका. त्यात पाणी भरून माठाचे तोंड कापडाने घट्ट बांधा. आता यातून तुम्ही पाणी दुसऱ्या भांड्यात नितळून घ्या. हे पाणी स्वच्छ झालेले तुम्हाला दिसेल.
पाणी शुद्ध करण्याची ही पद्धतही खूप लोकप्रिय झाली आहे. ब्लीचने पाणी स्वच्छ करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्लीचमध्ये सुगंध, रंग किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू नयेत. पाणी स्वच्छ करण्यासाठी, प्रथम पाणी गरम करा, नंतर 1 लिटर पाण्यात ब्लीचचे 2 ते 3 थेंब टाका, अशा प्रकारे तुमचे पाणी स्वच्छ होईल.
अनेक काळापासून अशुद्ध पाण्यासाठी घरी तुरटीचा वापर केला जातो. जेव्हा गढुळ पाणी स्थिर होईल तेव्हा त्यावर तुरटीचा खडा फिरवावा. ज्यामुळे, काही तासात तुमचे पिण्याचे पाणी शुद्ध होईल.
जर पाणी शुद्ध करण्याचा कोणताही उपाय शक्य नसेल तर तुम्ही सूर्यप्रकाशाचीही मदत घेऊ शकता. यासाठी पारदर्शक बाटलीत पाणी भरून सूर्यप्रकाशात ठेवावे. लक्षात ठेवा की पाणी कमीत कमी 6 तास सूर्यप्रकाशात ठेवले पाहिजे, यामुळे पाण्यात असलेले बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात.