हे तीन घरगुती 'फूट सोक' दूर करतील पायांचा वास  

homemade foot soak for smelly feet
homemade foot soak for smelly feet
Updated on

कोल्हापूर -  उन्हाळ्यात पायाला घाम येणाची समस्या अनेकांता सतावत असते. या घामामुळे पायाचा वासही येत असतो. ही समस्या दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडयक्ट उपलब्ध आहेत. परंतु, तुम्ही घरगुती उपाय करूनही या समस्येतून मुक्त होऊ शकता. 

 पायांचा वास घालवण्यासाठी घरीच फूट सोक तयार करा आणि त्यामध्ये पाय ठेवून काही वेळ बसा. हे फूट सोक करणे खूप सोपे आहे. चला तर मग पाहुया कसे तायर करायचे फूट सोक. 
 

अॅप्पल सायडर व्हिनेगर फूट सोक
 अॅप्पल सायडर व्हिनेगर फूट सोक आणि ब्यूटी हे दोन्ही खूप फायदेशिर आहे. याबरोच शरीराचा वास दूर करण्याची क्षमता आहे. 

साहित्य 
एक टब पाणी
2 मोठे चमचे अॅप्पल सायडर व्हिनेगर
1 मोठा चमचा माऊथ फेशनर 
एक मोठा चमचा मीठ 

कृती 
प्रथम पाणी थोडे गरम करून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात अॅप्पल सायडर व्हिनेगर, माऊ फेशनर आणि मीठ मिसळून घ्या. नंतर पंधरा ते तीस मिनिटे पाय सोडून बसा. अर्ध्या तासानंतर पाय स्वच्छ ध्वूवा. आता तुम्ही पाय टाॅवेलने पुसून घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. 
 
 लिंबू फूट सोक 

लिंबूमध्ये ब्लीचिंग आणि क्लींजिंग गुणधर्म तसेच दुर्गंधी दूर करण्याची क्षमता आहे.। याचाही फूट सोक तयार करत येते.  

साहित्य 
एक टब पानी 
 दोन मोठे चमचे लिंबूचा रस 
 एक मोठा चमचा गुलाब पाणी 
 पाच थेंब खाणयाचे तेल 

कृती 
पाणी थोडं कोमट करून ते टबमध्ये भरून घ्या. आता पाण्यात दोन मोठे चमचे लिंबूचा रस टाका. रस पिळून राहिलेली लिंबं पाण्यात टाका. आता एक मोठा चमचा गुलाब पाणी  त्या कोमट पाण्यात टाका. त्यानंतर पाच थेंब खाण्याचे तेल टाका. आता या पाण्यात पंधरा मिनिट पाय ठेवा. पाण्यातील लिंबाने पायाला चांगले चोळून घ्या. स्वच्छ पाण्याने पाय कोरडे करून टाॅवेलने चोळून साफ करा. हा उपाय रोज केला तरी चालतो. रोज शक्य नसल्यास आठवड्यातून तीन चार वेळा करा. 

  
बेकिंग सोडा फूट सोक 

बेकिंग सोडा खूपच एक्झोलीएटर असतो. तो त्वचेवर टाकताच मेलेली स्किन नाहीसी करते. तसेच त्वचेला येणारा वासही कमी करते.  

साहित्य
एक टब पाणी  
दोन चमचे बेकिंग सोडा 
एक दोन ग्लास दूध  
एक मोठा चमचा नारळाचे तेल

कृती 
सर्व प्रथम टबमध्ये कोमट पाणी घ्या.  आता एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिक्स करून मिश्रण तयार करा. मिश्रण पायांना हळूवार लावा. बोटांच्या मध्येही लावा. 
 आता टबमध्ये एक ते दोन ग्लास दूध मिक्स करा आणि नारळाचे तेल टाका. या पाण्यात पंधरा मिनिटे पाय ठेवा. त्यानंतर पाय स्वच्छ धुवून टाॅवेलने पूसा. आठवड्यातून दोन तीन वेळा करा. 
 
 
 इतर टिप्स 
पायाचा वास येऊ नये म्हणून रोजच्या रोज साॅक्स बदला. 
 
 शूज आतून आणि बाहेरून स्वच्छ ठेवा. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()